२७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
परिषदेमध्ये डॉ. आंबेडकरांनी जी अमोलिक कामगिरी केली त्याबद्दल अस्पृश्य समाज त्यांच्याविषयी धन्यवाद गातच होता ; परंतु प्रत्यक्ष दर्शन व भेटीशिवाय त्यांच्या धडाडीच्या कार्याविषयी आपल्या अंतःकरणातील जाणीव व्यक्त होणार नाही असे प्रत्येकाला वाटत होते. ता. २९ जानेवारी १९३२ रोजी एस. एस. मुलतान बोटीने मुंबईस येतो अशा आशयाची तार येथे येताच अस्पृश्य समाजात आनंदाचे वातावरण दुमदुमून गेले. २९ तारखेची प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पहात होता आणि शेवटी तो त्यांच्या आगमनाचा दिवस गेल्या शुक्रवारी उगवला. ॥
डॉ. आंबेडकर सकाळी सहा वाजता बॅलार्ड पियरवरील मोल स्टेशनवर विलायतच्या बोटीने उतरणार होते तरी अस्पृश्य बंधुभगिनींचा असंख्य जमाव पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून मोल स्टेशनावर जमू लागला होता. प्रत्येकाच्या मुखावर आनंदाच्या, एकप्रकारच्या समाधानाच्या आणि संतोषाच्या भावना स्पष्टपणे दिसत होत्या. ' डॉ. आंबेडकर की जय' च्या जयघोषणेने' अंतःकरणातील प्रेमाचा-डॉ. आंबेडकरांविषयीच्या भक्तीच्या भावनेचा-असा उमाळा मुखातून आनंदातिशयाने उमटत होता. डॉ. आंबेडकरांचा जयजयकार असो, अशी भगिनीवर्गानी केलेली जयघोषणा मधूनमधून 'उमटत होती. डॉ. आंबेडकरांचे दर्शन कधी व कसे होते याची आतुरता त्यांना लागून राहिली होती. एकदाचे सहा वाजले. डॉ. आंबेडकर आता. आपणास ia, भेटणार ह्या उत्सुकतेने सर्वाचे डोळे मुलतान बोटीकडे लागले होते. इतक्यात डॉ. आंबेडकरांनी बोटीच्या डेकवर येऊन ओझरते दर्शन दिले आणि त्यांच्या जयजयकाराने ते सारे वातावरण अगदी गजबजून गेले.
डॉ आंबेडकरांचे स्वागत मोल स्टेशनवरील एका भव्य हॉलमध्ये करण्याचे आगाऊच ठरले होते. तो हाँल असाधारणपणे सुशोभित करून एक उच्च आसन मुद्दाम उभारले होते. डॉ. आंबेडकर येणार त्याच बोटीने मौ. शौकत अलीही येणार होते आणि त्यांचेही स्वागत करण्याकरता मुसलमान बंधू व खिलापत स्वयंसेवकांनी तयारी केली होती. याच हॉलची अर्धी बाजू मुसलमान बंधुंना दिलेली होती. एका बाजूला मुसलमान समाज व दुसऱ्या बाजूला अस्पृश्य समाज अशी त्या हॉलची विभागणी केलेली होती. डॉ. आंबेडकरांच्या स्वागतासाठी जसे अस्पृश्य लोक आतुर झालेले होते तसेच मौ. शौकत अलीच्या स्वागतासाठी मुसलमान बंधूही आतुर झाले होते. उभयतांच्या स्वागताची. वेळ सात वाजताची ठरली होती. तोपर्यंत बोटीवर त्यांच्या सामोरे अस्पृश्य व मुसलमान समाजातील पुढारी गेले होते. स्वागताच्या पूर्वी बोटीच्या अगदी वरच्या डेकवर डॉ. आंबेडकर व श्री. देवराव नाईक, भाई प्रधान, डॉ. प्रधान, श्री. असईकर, कद्रेकर, गुप्ते, प्रधान, खांडके, शिवतरकर, रणखांबे . वगैरे