हा खंड सर्व दृष्टीने परिपूर्ण होण्यात प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे आणि प्रा. केशव मेश्राम यांचा मोलाचा वाटा आहे.
या खंडाच्या निर्मितीप्रक्रियेत सर्वश्री प्रा. डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रा. डॉ. विजय कविमंडन, प्रा. डॉ. भा. ल. भोळे, प्रा. गौतम खु. कांबळे, प्रा. दत्तानंद इंगोले, प्रा. डी. एस. मून, प्रा. आर. के. तुपे, संजय एन. कांबळे आणि बी. एन. बागडे यांचे सहकार्य लाभले.
वसंत मून यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट, 'नालंदा' ४४७, हनुमाननगर, नागपूर येथून अधिकांश भाषणे उपलब्ध झाली. भालचंद्र लोखंडे, महेन्द्र गांजरे, रमेश कोसारे आणि प्रल्हाद मेंढे यांचेकडून काही प्रमाणात साहित्य उपलब्ध झाले. प्रदीप गायकवाड आणि विनोद आटे, फोटोग्राफर, यांचेकडून छायाचित्र प्राप्त झाले. त्यांचे आभारी आहोत.
डॉ. कृष्णा एम. कांबळे आणि डॉ. सिद्धार्थ जे. कांबळे यांनी वेळोवेळी केलेल्या मौलिक सूचना आणि त्यांचे सहकार्य विसरता येणार नाही.
शासकीय मुद्रणालय नागपूरचे व्यवस्थापक श्री. रु. दि. मोरे यांनी या खंडाच्या सुबक आणि सुंदर मुद्रणासाठी तसेच वेळापत्रकाप्रमाणे छपाई होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच या मुद्रणालयातील संबंधित कर्मचाऱ्यांनी आस्थापूर्वक केलेल्या सहकार्यामुळेच हा खंड नियोजित वेळेत प्रकाशित होऊ शकला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती संपादक मंडळाच्या पाठीशी असल्याची जाणीव निश्चितच उत्साह वाढविणारी होती.
AN DAN? Nes: s ý a J sea by
as,
(प्रा. अशोक गोडघाटे) | (प्रा. डॉ. म. ल. कासारे) (एन. जी. कांबळे)
(अठ्ठावीस)