२९-११-१९३२ स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा दीप कधीही विझता कामा नये - Page 325

स्वाभिमानाचा . . .... विझता कामा नये २८३

माझ्या गैरहजेरीत येथे वर्तमानपत्रामध्ये माझ्याविषयी पुष्कळच गहजब करण्यात आला होता. मी राष्ट्रद्रोही ठरविण्याचा येथील राष्ट्रीय बाण्याच्या पत्रकारांनी शक्य तितका प्रयत्न केलेला असताही माझ्या बंधुभगिनीनी जो माझ्यावर निढळ विश्वास टाकून आपले कार्य उलट जोमाने पुढे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्याबद्दल मला खरोखरच धन्यता वाटत आहे. मी म. गांधींना राऊंड टेबल परिषदेमध्ये विरोध केला म्हणून मी राष्ट्रद्रोही ठरलो असेन. परंतु या आरोपाची मला मुळीच भिती वाटत नाही. उलट माझ्या बांधवांच्या गुलामगिरीतून सुटका करण्याच्या उच्च वृत्तीच्या कार्यात, महात्मा म्हणविणाऱ्या व्यक्तीकडून प्राणाच्या पणाने विरोध व्हावा हीच गोष्ट जगाच्या दृष्टीने किती अन्याय्य वृत्तीची आहे ही विचारी माणसे आपोआपच ठरवू शकतील. माझी मनोदेवता मला सांगते की, मी चांगल्या रस्त्याने चाललो आहे. तोपर्यंत मला लोकांच्या स्वार्थी आरोपांची मुळीच पर्वा वाटत नाही. मी राष्ट्रद्रोही आहे, देशद्रोही आहे असे आज जे लोक म्हणत आहेत ते भविष्यकाळात याच्या उलट माझ्या कामगिरीविषयी बोलल्याशिवाय राहणार नाहीत. आजचे वादळी वातावरण पुढे काही दिवसांनी शांत झाल्यावर व राऊंड टेबल परिषदेमधील सर्व कार्याचा नीट शांतपणे विचार केल्यावर त्यांचे माझ्याबद्दलचे मत खात्रीने बदलेल. येथे राष्ट्रीय पत्रात येणाऱ्या बातम्यात व तेथील राऊंड टेबल परिषदेमधील कामकाजात किती तफावत होती हेही त्यांना कळून चुकेल आणि माझी खात्री आहे की, हिंदूंची पुढील पिढी ' मी राष्ट्राची चांगली कामगिरी केली ' असेच म्हणेल.

माझी व म. गांधींची विलायतेला जाण्यापूर्वी पहिलीच भेट व मुलाखत झाली होती व ती तुम्हा सर्वांना ठाऊक आहेच. राऊंड टेबल परिषदेच्या कार्यक्रमात म. गांधींची व माझी तीनदा चांगली चार चार, पाच पाच तास मुलाखत झालेली आहे. परंतु त्यांनी अगदी शेवटी मुसलमान व शीख समाजाशिवाय इतर कुठल्याही समाजाला स्वतंत्र मतदार संघ मी देऊ शकत नाही असे स्पष्टपणे उत्तर दिले. अल्पसंख्यांक कमिटीतील मुसलमान प्रतिनिधी व माझी ताटातूट व्हावी, मुसलमानांनी मला आपले सहाय्य देऊ नये याविषयीची भेदनीती म. गांधींनी कशी आरंभिली होती याचे प्रत्यक्ष कागदोपत्री अस्सल पुरावे माझ्याजवळ आहेत. यावरूनच म. गांधी हे महात्मा पदाला माझ्या दृष्टीने तरी कितपत पात्र आहेत याबद्दल शंका वाटते. म. गांधींच्या प्रयत्नांना मुसलमानांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविताच ते चिडले व त्यांनी माकंटमधून एक कुराण विकत घेतले आणि ते एच. एच. आगाखान ज्या हॉटेलमध्ये राहात होते तेथे गेले. त्यांनी त्यांच्यापुढे कुराण पुढे केले आणि ते म्हणाले की, कुराणात हिंदू-हिंदूत दुही