२९-११-१९३२ स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा दीप कधीही विझता कामा नये - Page 326

२८४ डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

माजवावी असे कुठे काही लिहिले आहे का दाखवा. यावेळी मि. आगाखान इतकेच म्हणाले की, अस्पृश्य समाज हा आमच्या समाजाहून अगदी पददलित आहे. आम्ही ज्याअर्थी, आमच्या संरक्षणाच्या हक्कासाठी भांडत आहोत त्याअर्थी, त्यांच्या संरक्षणाच्या न्याय्य हक्काच्या मागणीला आम्ही विरोध तरी कसा करावा ? या उत्तराने म. गांधीजी मागल्या पाऊली आपल्या निवासस्थानी परतले. | 7

आपण माझी म. गांधींप्रमाणे निष्कारण स्तुती करून आपण मला देवपदाला चढवू नका. देवपदाला चढवून इतरांनी. आंधळेपणाने असल्या देवपदाला चढलेल्या देवमाणसाच्या मागे लागलेले निदान मला तरी स्वत:च्या कमकुवतपणाचे लक्षण दिसते. तुम्ही तुमची संघटना करा व शिस्तीच्या, हिमतीच्या मार्गाने आपली सर्वांगीण उन्नती करून घ्या.

डॉ. आंबेडकर यांचे भाषण होताच त्यांनी नाशिक मंदिर प्रवेश सत्याग्रहींच्या लढ्यात शिक्षा भोगून सुदून आलेल्या सत्याग्रही वीरांचा त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून सन्मान केला. तसेच सातारा जिल्ह्यातील अस्पृश्य समाजातील चित्रकलेचे विद्यार्थी श्री. सावंत यांना जे. जे. आर्ट स्कूलच्या चित्रकलेच्या प्रदर्शनात चित्रकलेमध्ये उत्तम प्रकारचे सटिफिकेट व भावनगरच्या महाराजांनी ठेवलेले . २००, रुपयांचे बक्षिस मिळाल्याबद्दल जाहीर अभिनंदन करण्यात आले. त्याला याप्रसंगी नगर जिल्ह्यातफं एक सुवर्ण पदक व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

रात्रौ मध्यरात्रीपर्यंत डॉ. आंबेडकर व इतर प्रांतीय yera विचारविनिमय झाला.

७ ७ ७