२९-११-१९३२ स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा दीप कधीही विझता कामा नये - Page 327

४८
स्वावलंबनासाठी वर्तमानपत्राची गरज

दुसऱ्या राऊंड टेबल परिषदेने ठरविल्याप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटने निवडलेल्या मतदान चौकशी कमिटीच्या कामकाजास या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली येथे लॉर्ड लोथियन यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात झाली. प्रथम दिल्ली येथे मतदान . कमिटीच्या कामाची सर्वसाधारणरित्या एक ठराविक रुपरेषा आखण्यात.आली व त्या रुपरेषेच्या आधारे हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांतात व त्या त्या प्रांतातील खेडोपाडी. सुद्धा जाऊन चौकशी व साक्षी घेण्याचे ठरले. त्या मतदान कमिटीत अस्पृश्य वर्ग व इतर मागासलेल्यां . समाजाच्या वतीनें डॉ. बी. आर. आंबेडंकर यांची योजना झालेली आहे. बहुजन अशा पददलित आणि मागासलेल्या समाजांच्या समानतेच्या हक्कासाठी या कमिटीच्या वतीने डॉ. आंबेडकर यांनी काम करण्याचे आपले धोरण स्वीकारले आहे. दिल्लीहून मतदान कमिटीचा दौरा लखनौ येथे झाला. येथील शहरातील सर्व परिस्थिती स्थानिक मतदान कमिटीच्या सहकार्याने आजमावल्यावर आजुबाजूच्या काही खेंड्यापाड्यातून कमिटीचे सभासद चौकशीकरिता गेले |

मतदान कमिटीच्या दौऱ्यावर असताना लखनौ येथे तेथील पददलित व मागासलेल्या समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. या सन्मान समारंभी भाषण करताना डॉक्टरसाहेब म्हणाले,

अखिल बहिष्कृत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी बहिष्कृत समाज सेवा संघाचे एखादे मध्यवर्ती मंडळ निर्माण करावयास पाहिजे आणि शिवाय आपल्या स्वावलंबनाच्या चळवळीचा विस्तृत व सर्व ठिकाणी प्रसार होण्याकरिता निदान प्रत्येक प्रांतात आपले एक तरी वर्तमानपत्र पाहिजे आणि माझी माझ्या सर्व बंधुभगिनींना इतकीच अत्यंत आग्रहाची विनंती आहे. की, आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले राजकीयं हक्क मिळविण्यासाठी शक्य तितके जोमाचे प्रयत्न केले पाहिजे. नाही तर भावी राज्यात आपली फारच शोचनीय अवस्था होईल ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. |

जनता : १३ फेब्रुवारी, १९३२.

भाषणाची तारीख दर्शविलेली नाही- संपादक.