२९-११-१९३२ स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा दीप कधीही विझता कामा नये - Page 328

४९
भेदनीतीचा प्रयोग मी माझ्यावर
होऊ दिला नाही

मुंबईच्या अस्पृश्य जनतेला मद्रासच्या अस्पृश्य जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तारीख २८ फेब्रुवारी १९३२ च्या जाहीर सभेत जे अपूर्व व अतूल उत्साहाने स्वागत केले त्याबद्दल कदाचित नवल वाटणार नाही. कारण डॉ. आंबेडकरांविषयी आपला विश्वास मुंबईच्या अस्पृश्य जनतेने अनेकवार व्यक्त केला आहे. असे असले तरी परबा मद्रास येथे डॉ. आंबेडकरांचे जे प्रचंड स्वागत झाले तसले स्वागतप्रसंग मद्रास सारख्या शहरातही क्वचितच पाहावयास मिळतात. या दिवशीच्या सभेत अस्पृश्य समाजाचेच कमीत कमी दहा हजारावर लोक जमले होते. हजारो लोकांना जागा न मिळाल्यामुळे परत जावे लागले. अस्पृश्य समाजातील लोकांशिवाय ब्राह्मणेतर स्पृश्य हिंदूंचा व खिश्चन मुसलमानादिकांचाही समुदाय फार जमला होता.

शहरातील अस्पृश्य समाजापैकी सर्व जातींचे प्रमुख व कायदेकौन्सिलातील सर्व अस्पृश्य प्रतिनिधी तर हजर होतेच पण ' जस्टिस ' व मुसलमान पक्षातील प्रमुख पुढारीही स्वागतार्थ आले होते.

' डिप्रेस्ड क्लासेस सर्व्हिस आर्मि ' (दलित समाज सेवा सैन्य) संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत सुंदरराव नायडू यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते.

' पददलित जनतेचा निर्भय ब खरा प्रतिनिधी ' या यथार्थ शब्दांनी डॉ. आंबेडकरसाहेबांची जमलेल्या जनतेला अध्यक्षांनी ओळख करून दिली व डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य जनतेच्या एकंदर मनोरचनेत केवढी अपूर्व व विलक्षण क्रांती घडवून आणली आहे व त्यांच्यातील माणुसकीला व आत्मसन्मानाला कसे जागविले आहे याचे थोडक्यात व मुद्देसूद वर्णन केले.

अध्यक्षांच्या या प्रास्ताविक भाषणानंतर दलित समाज सेवा सैन्य, मद्रास प्रांतिक डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन, दी प्रेसिडेन्सी आदि द्रवीड महाजन सभा, आदि आंध्र महासभा, अरूंधत्येय महासभा, केरळ डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, लेबर युनियन व आणखी अनेक संस्थांमार्फत डॉ. आंबेडकरांना मानपत्रे व हारतुरे अर्पण करण्याचा समारंभ झाला.

या वरील सर्व संस्थांचे व जमलेल्या जनसमूहाचे आभार मानण्याकरता डॉ. आंबेडकर जेव्हा उभे राहिले तेव्हा स्वागतादर्शक टाळ्यांचा प्रचंड

जनता : ५ मार्च १९३२.