भेदनीतीचा प्रयोग मी माझ्यावर होऊ दिला नाही . २८७
कडकडाट झाला. ते आपल्या भाषणात म्हणाले,
मद्रासच्या अस्पृश्यं जनतेने व इतर मंडळींनी व्यक्त केलेल्या आपलेपणाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आतापर्यंत अस्पृश्य समाजात आपल्या राजकीय हक्काबाबत एकवाक्यता होती व तिचा विलक्षण प्रभाव इतर समाजावर पडू शकला. . रावबहादूर एम. सी. राजांनी एकाएकी व तसे काही कारण नसता या एकतेचा भंग केल्यामुळे आपला आधीच बिकट असलेला. मार्ग अवघड झाला आहे. डॉ. मुंजेच्या भेदनीलीला रावबहादूर राजा हे फार लवकर व अकल्पितपणे बळी पडले. रावबहादूर राजांनी जर थोडासा अधिक दम धरला असता व त्यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे नागपूरला सभा भरवून अस्पृश्य जनतेचे लोकमत अजमावून जर डॉ. मुंजेंबरोबर करारनामा केला असता तर आपल्या समाजाकरता रा. ब. राजांना अधिक सवलती व अधिक लाभ संपादन करता आला असता... आज त्यांनी पांढरपेशा वर्गातील काही पुढाऱ्यांच्या व्यक्तिगत व शाब्दिक -शाबासकीपेक्षा अधिक काही मिळविले नाही. डॉ. मुंजेंबरोबर माझीही वाटाघाटी अनेक वेळा झालेली आहे. त्यांच्याशी मी जरी ' पँक्ट ' केलेला नाही तरी त्यांचा माझा काही खाजगी वैरभाव नाही. पण मी जाणतो आणि डॉ. मुंजेष्ठी ओळखून आहेत की ते अस्पृश्यतेपुढे लाचार आहेत. भेद पाडणे ही सोपी गोष्ट त्यांना करता आली. कारण ती त्यांच्या हातची होती. पण स्पृश्य जनतेच्या मनोवृत्तीत बदल करणे त्यांच्या आटोक्याबाहेरचे आहे. हे मी जाणले व म्हशून त्यांच्या व्यक्तिगत भेदनीतीचा प्रयोग मी माझ्यावर होऊ दिला नाही. पण रावबहादूर राजांवर त्यांना सहज छाप टाकता आली. इतक्या सुलभपणे रावबहादूर राजांनी त्यांच्या आहारी जावयाला नको होते.
मी व्यक्तिशः संयुक्त मतदार संघ, सार्वत्रिक मतदानाचा हक्क व अस्पृश्यांकरता राखीव जागा असाव्यात या मताचा पुरस्कार आधीच केला होता. पण माझे हे . मत दिसायला जरी ' राष्ट्रीय ' व व्यापक असले तरी अस्पृश्य जनतेला यापासून बिलकूल फायदा होणार नाही असे आपल्याच अनेक संस्थांनी मला बजावून सांगितले. मी नागपूरला संयुक्त मतदार संघाचा पुरस्कार करताच माझ्यावर रावबहादूर राजांनी केवढा गहजब उडविला होता हे आपल्यापैकी पुष्कळांच्या आजही चांगले ध्यानात असेल. - अगदी परवापर्यंत स्वतंत्र मतदार संघाचा मी पुरस्कार करावा असा ससेमिरा माझ्यामागे रावबहादूर राजांचा व इतर प्रमुख पुढाऱ्यांचा एकसारखा लागलेला होता. अशा परिस्थितीत मी माझी व्यक्तिगत आवड निवड बाजूला ठेवून अस्पृश्यांना जे पाहिजे त्याचा पुरस्कार केला यात वाईट काय केले ? शिवाय राऊंड टेबल परिषदेमध्ये कोणत्या परिस्थितीत आम्ही सापडलो होतो व तेथे अल्पसंख्यांकांचा जो एक करार झाला त्याला अस्पृश्यांच्या