अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे हवीतच २९३
ह्या कपौंडमध्ये लोकांना डॉ. साहेबांचे दर्शन व्हावे म्हणून लहानसे आसन तयार करण्यात आले होते. गार्ड ऑफ ऑनरची सलामी होताच डॉ. आंबेडकर लोकांच्या जयजयकारात येथे येऊन बसताच अगोदरच आलेले काँग्रेसचे अध्यक्ष व रावबहादूर श्रीनिवासन तेथे येऊन बसले. लोकांकडून ह्या तिन्ही पाहुण्यांचा हारतुऱ्यांनी सन्मान झाला. अध्यक्ष व डॉ. आंबेडकर ह्यांची मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगताच लोकात आणखीच उत्साह वाढला. नानाप्रकारच्या फुलांनी श्रृंगारिलेल्या मोटरमध्ये डॉ. आंबेडकर, मुनुस्वामी पिल्ले व रा. ब. श्रीनिवासन ह्यांना बसविण्यात. आले होते. इतर पाहुण्यांकरिता आणखी मोटारी देखील मिरवणुकीत. होत्या. बरोबर ९.४५ ला मिरवणूक सुरू झाली. १०,०००-१५,००० चा प्रचंड जनसमुदाय ' डॉ. आंबेडकर की जय ' करीत बरोबर: चालत होता. वरून GS जरी जोराने तापत होते तरी लोक त्याला दाद देत नव्हते. इंदोरा, गड़ीगुदामला मिरवणूक येताच जवळ जवळ
५०० स्त्रिया डॉ. आंबेडकरांना पुष्पहार घालण्याकरिता सामोऱ्या आल्या. काही वेळ मिरवणूक थांबविण्यात आली. खडॉक्टरसाहेबांनी त्यांचा प्रेमाने निरोप घेतल्यावर मिरवणूक पुढे गेली. - मांडवापर्यंत मिरवणूक येताच श्री. साखरे यांनी काँग्रेसचे अधिवेशन संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल म्हणून सांगिलले व लोकांना आपले जेवणखाण आटोपण्यास विनंती केली. स्टेशनवरून निघालेली मिरवणूक . इंदोऱ्यापर्य॑त आली व तेथे ती लोकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून संपविण्यात आली. . पाहुण्यांच्या मोटारी मग तशाच कामठी येथे जाण्यास निघाल्या. नागपूरपासून कामठी गाव अवघे १० मैल आहे. येथे गावच्या वेशीजवळ येताच पुन्हा कामठी येथील लोकांतफे स्वागत होऊन काँग्रेसच्या मांडवापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ह्याही मिरवणुकीत सहा सात हजार स्त्रीपुरूष मंडळी होती. समोर बँड वाजत होता; व डॉ. आंबेडकरांचा जयघोष चालू होता. |
पंजाब, संयुक्त प्रांत, बंगाल, बिहार, ओरिसा, मुंबई वगैरे ठिकाणचे प्रतिनिधी शुक्रवारीच कामठीस येऊन पोहचले होते. |
काँग्रेसचा मांडव फारच मोठा असून त्यात १५,००० पर्यंत लोकसमुदाय बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून तो लतापताकांनी सुशोभित केला होता. अध्यक्ष व इतर पुढाऱ्यांकरिता चांगला सुंदरसा प्लॅटफार्म तयार करण्यात आला असून त्यावर कोचेस, खुर्च्या वगैरे ठेवण्यात आलेल्या होत्या. आलेल्या प्रतिनिधींकरीता प्रशस्त बंगले भाड्याने घेण्यात आले होते. कॉंग्रेसच्या मांडवात जाण्याकरिता एक मुख्य व इतर तीन दरवाजे ठेवण्यात आलेले होते. जवळच