२९४ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
प्रतिनिधीचे टिकीट घेण्याचे ऑफिस उघडण्यात आले असून बाजूलाच पण जरा दूर दुकानदारांची सोय करण्यात आलेली होती. अध्यक्षास थोडासा उशीर झाल्यामुळे बरोबर ६ वाजता काँग्रेसच्या बैठकीस सुरवात झाली. प्लॅटफार्मवर दर एक प्रांतातील प्रमुख पुढाऱ्यांची बसण्याची सोय केलेली होती. ह्या प्रमुख लोकात बंगालचे श्रीयुत मलिक, दुसीया, विश्वास, यु. पी. चे स्वामी अच्छुतानंद, रामसहाय, बलदेव प्रसाद, जयस्वाल, शामलाल, बक्तावरलाल, पंजाबचे मि. हंसराज, हरीराम, जालंदरचे गुरूहंतासिंग, बिहारचे श्री. श्रीधर रासमल, पुण्याचे सुभेदार घाडगे, नाशिकचे पतितपावनदास, मद्रासचे श्री. कॅनन व रा. ब. श्रीनिवासन, मुंबईचे डॉ. आंबेडकर, शिवतरकर, खोलवडीकर, वनमाळी वगैरे पुढारी लोक प्रामुख्याने दिसत होते. बरोबर ६ वाजता स्वागत कमिटीचे अध्यक्ष श्री. हरदास हे भाषण करावयास उभे राहिले. स्वागताध्यक्षांचे भाषण होऊन अध्यक्षांचे भाषण झाले. नंतर ठिकठिकाणाहून आलेल्या ५०-६० तारा व तेवढीच पत्रे स्वागत कमिटीचे सेक्रेटरी ह्यांनी वाचून दाखविली त्यात फक्त एक तार खेरीज करून बाकी सर्व तारा स्वतंत्र मतदार संघाला पाठिंबा देणाऱ्या, राजा-मुंजे कराराचा निषेध करणाऱ्या व रावबहादूर श्रीनिवासन व डॉ. आंबेडकर यांच्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या होत्या. या सर्व पत्रव्यवहाराचा व तारांचा या ठिकाणी तरजुमा देणे किंवा उल्लेख करणे स्थलाभावामुळे अशक्य आहे. तथापि काहींचा उल्लेख करणे अवश्य आहे. त्यापैकी मुंबई इलाख्यातील मुक्काम मदग, जिल्हा धारवाड येथून रा. निलाप्पा एलाप्पा बेलोडी, म्युनिसीपल स्कूल मेंबर व बसाप्पा नागप्पा घोडके, जनरल मर्चंट यांनी स्वागताध्यक्ष यांना खालील पत्रक लिहिले होते.
“सप्रेम नमस्कार, वि. वि. आपल्या काँग्रेस बद्दलची नोटीस जनता पत्रातून पाहिली. काही अडचणीमुळे आम्हास सभेस हजर राहाता येत नाही. आमच्या- कडील सर्व अस्पृश्य लोकांचा डॉ. आंबेडकरांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा असून तेच आमच्या अस्पृश्य समाजाचे खरे पुढारी आहेत. डॉ. मुंजे व रा. ब. राजा यांच्या पॅक्टला आमच्या कर्नाटकी जनतेचा पाठिबा नाही. रावबहादूर राजा व गवई यांनी आयत्यावेळी स्वतंत्र मतदार संघाला विरोध करून जो अवसानघातकोपणा केला याच्याबद्दल इकडील सर्व जनतेला त्यांचा निषेध करणे भाग पडले आहे. आमचे हे पत्र सभेत वाचून दाखविण्याची मेहेरबानी werd.’
मुंबईहून रोहिदास ज्ञानोदय समाज या संस्थेने रा. वनमाळी यास आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले होते व त्यांच्याबरोबर जो संदेश पाठविला होता, त्यात स्वतंत्र मतदार संघच अस्पृश्यांना पाहिजे असे म्हटले आहे.