८-५-१९३२ अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे हवीतच - Page 338

२९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ठराव ३ रा.--बंगाल प्रांतातील मिदनापूर जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट मि. डगलस, आय. सी. एस. यांचा अमानुषपणे खून करण्यात आला. त्याचा ही काँग्रेस निषेध करते व रा. डगलस यांच्या कुटुंबाबद्दल आपली सहानुभूती व्यक्‍त करते.

ठराव॑ १, २, ३ हे अध्यक्षांनी अध्यक्षपदावरून मांडले ते सर्वांनुमते पास झाले.

ठराव ४ था.--नवीन राज्यघटनेत अस्पृश्यांचे हितसंबंध पूर्णपणे रक्षण करण्याची व्यवस्था करू, अशा प्रकारचे अभिवचन दिल्याबद्दल ही काँग्रेस सेक्रेटरी

ऑफ स्टेट यांना धन्यवाद देते. परंतु सरकारशी सहकारिता करणाऱ्या पक्षाकडे

दुर्लक्ष करून सरकारशी असहकार करणाऱ्या पक्षाची मनधरणी करण्याचा सरकारी धोरणाचा जो कल दिसून येतो, त्याबद्दल ही काँग्रेस आपली दिलगिरी व्यक्त करते.

. ठराव मांडणार- मि. विश्वास (बंगाल)

अनुमोदन--मि. बलदेवप्रसाद (संयुक्त प्रांत)

ठराव सर्वानुमते पास झाला.

ठराव ५ वा.--(अ) राऊंड टेबल कॉन्फरन्समधील अल्पसंख्यांकांच्या करारनाम्यास ही काँग्रेस आपली संमती देते.

(ब) ही काँग्रेस सार्वभौम सरकार यास असे कळवू इच्छिते की, अल्पसंख्यां- कांच्या करारनाम्यात जे काही हक्क अस्पृश्यांचे म्हणून दर्शविले गेले आहेत ते कमाल हक्क नसून किमान हक्क आहेत. व त्यात कोणत्याही प्रकारची छाटाछाट किंवा फेरबदल करण्यास ही काँग्रेस कबूल नाही व तशी छाटाछाट किंवा फेरबदल करण्यात आल्यास त्यासंबंधी अस्पृश्य वर्गाच्या हल्लीच्या राजकीय धोरणात फेरबदल करणाचा अधिकार ही काँग्रेस राखून ठेवीत आहे.

(क) ही काँग्रेस सार्वभौम सरकारास असे जाहीर करू इच्छिते की, अल्पसंख्यांकांच्या करारनाम्यात वीस वर्षानंतर अस्पृश्य वर्ग स्वतंत्र मतदार संघाच्या ऐवजी एकत्रित मतदार संघ मान्य करील, असे जे कलम आहे त्याच्या पूर्ततेसाठी शिरोगणती मतदान पद्धत ही एकच शर्त नसून अल्पसंख्यांकांच्या करारनाम्यात जेवढ्या प्रतिनिधींच्या जागा मागण्यात आल्या आहेत तेवढ्या त्यांना मिळणे ही महत्त्वाची शर्त आहे.

(ड) अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी कमी व्हावेत म्हणून अस्पृश्यांची लोकसंख्या कमी दाखविण्याचा हिंदू लोकांचा जो उपक्रम चालू झाला आहे. त्याचा ही काँग्रेस निषेध करते व त्यांनी दिलेली लोकसंख्या खरे मानणे हे धोक्याचे आहे, असे सार्वभौम सरकारास जाहीर करते.