२३-५-१९३२ वदर्शनाशिवाय कोणी मरत नाही - Page 345

Ud

आजचा आमचा लढा राजकीय सत्तेकरिता आहे

मुंबईच्या वडाळा, समस्त मंडळीच्या आग्रही विनंतीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाळा येथे सोमवार दिनांक ५ सप्टेंबर १९३२ रोजी रात्रौ ९ वाजता भरलेल्या सभेमध्ये हजर राहिले. सभा वाय. एम. सी. ए. च्या भव्य पटांगणात घेतली होती. पावसाची जरी मेहरनजर झाली होती तरी स्त्रीपुरूषांचा समुदाय ३,००० जमला होता. बरोबर नऊ वाजता बाबासाहेब सभेच्या जागी हजर झाले, फाटकापाशी तानाजी बालवीरांनी त्यांना सलामी दिली. या सभेची सर्व व्यवस्था वडाळा येथील गेंदाजी गायकवाड यांच्या स्काऊटनी केली.

पहिल्या प्रथम बालवीरांचे गायन झाल्यावर श्री. मोगल मारुती गायकवाड यांनी स्थानिक मंडळींच्यातफं बाबासाहेबांना चार शब्द सांगण्यास विनंती केली.

डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

मला गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात भाग घ्यावयाचा आहे असे कळल्यावर

थोडीशी खंत वाटली होती व मी गणपतीच्या मूर्तीबद्दल काही बोलणार होतो. मला येथे कोठेही गणपतीची मूर्ती दिसली नाही म्हणून मी त्याबद्दल आता काही बोलत नाही. या हिंदू धर्माने आपले जितके अकल्याण केले आहे तितके अकल्याण कोणत्याच साथीच्या रोगानेसुद्धा केले नाही. मी तुम्हाला सांगत नाही की, तुम्ही या हिंदू धर्माला चिकटून राहा. आज ज्या हिंदूधर्मात आम्ही २,००० वर्षे राहिलो, ज्यांची उभारणी केली व ज्यांचे रक्षण करण्याकरिता आमची सबंध आयुष्ये गेली त्याच हिंदू धर्मात आमची किंमत काडीमोल आहे. काही दिवसांपूर्वी मला काशीच्या ब्राह्मणांची पत्रे आली आहेत की, आम्ही तुमच्यास्तव काशी विश्वेश्वराची देवालये उघडी करितो, परंतु आम्हाला दगडाच्या देवालयांची मुळीच जरूरी नाही. आम्ही हा जो संग्राम चालविलेला आहे तो केवळ देवळे खुली व्हावीत म्हणून नव्हे किंवा शेवाळ साठलेल्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता नव्हे. आम्हाला ब्राह्मणांच्या घरात जावयाचे नाही. आम्हाला सहभोजन नको. आम्हा अस्पृश्यांना ब्राह्मणांच्या मुली नकोत, आमच्या समाजात का काही मुलीच नाही म्हणून आम्ही ब्राह्मणांच्या मुलींची अपेक्षा करावी, की आमच्या बायांना संतती होत नाही की, त्यांच्या पोटच्या पोरांना इंद्रिये नसतात. तसे काही नाही. तर आजचा आमचा हा लढा फक्त राजकीय सत्तेकरिता आहे. हिंदूंजवळ

जनता : १० सप्टेंबर १९३२.