१०-९-१९३२ अस्पृश्य समाजास शिक्षण प्रसाराची निकड - Page 352

३०८ डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

पुढे बाबासाहेबांनी जमलेल्या मंडळीस नीट पटावे म्हणून आजच्या परिस्थितीचे

एक शब्दचित्र रेखाटले. त्यांनी सांगितले की, या देशातील उच्चनीचता दृढमूल होण्यास समाजातील जातीव्यवस्था हे तर कारण आहेच पण तीस चिरस्थायित्व जातीतील गुणवैशिष्ट्यामुळे आले आहे. काही ठराविक जातीचे श्रेष्ठत्व इतर जातीतील ज्ञानाभावामुळे कायम राहिले. सरकार दरबारातील मोठमोठ्या नोकऱ्या, मामलतदारी किंवा पोलीस अधिकारी वगैरेसारख्या लोकांवर सत्ता गाजविणाऱ्या जागा या सर्वात अस्पृश्य समाजास अद्यापपावेतो संपूर्ण मज्जाव असे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात या समाजाची अवहेलना तर होतेच पण या समाजाकडे इतर जातींचा पाहण्याचा दृष्टिकोनही अगदी भिन्न प्रकारचा असतो. 'हा आकुंचित दृष्टिकोन बदलून आपल्या समाजाबाबत इतरांच्या मनात वावरत असलेली असमानतेची भावना नष्ट करावयाची असेल तर त्यास रामबाण उपाय म्हटला म्हणजे या अंमलदारीच्या जागा संपादन करणे हा होय. प्रत्यक्ष उदाहरण द्यावयाचे म्हणजे -आज डे. कलेक्टरचे काम करीत असलेल्या एका अस्पृश्य तरुणाचे होय. ते ज्या ज्या जिल्ह्यात जातात तेथील अस्पृश्य समाजास आपल्यावर खरेखुरे कृपाछत्र आहे असे तर वाटतेच पण शिवाय अस्पृश्यांना तुच्छतेने लेखण्याची जी इतर समाजाची भावना ती कमी व्हावयास लागते. असे अनेक अधिकारी झाल्यास आजची परिस्थिती पालटल्याशिवाय राहणार नाही परंतु आपण ही गोष्ट कधीही विसरता कामा नये की, जर आताच सागितलेल्या गृहस्थाने उच्च शिक्षण संपादन करून आपली लायकी प्रस्थापित केली नसती त हा थोडासा फरक देखील आपल्याला लाभला नसता. . हाडाची काडे करून त्यांनी शिक्षण संपादन केले नसते तर ही परिस्थिती प्राप्त झाली असती काय ? तेव्हा आपला व्यक्तीविषयक लौकिक वाढविणे व त्याबरोबरच आपल्या समाजाची योग्यता वाढविणे हे केवळ शिक्षणावर अवलंबून आहे. आज कायद्याने जरी आपण आपल्या समाजाकरिता सरकारी नोकरीत आपले प्रमाण ठरवून घेतले तरी योग्य ते शिक्षण घेऊन अंगी लायकी प्राप्त करून घेतल्याशिवाय आपल्या मागण्या निष्फळ होतील. यात आपले माप आपल्याच दौर्बल्यामुळे पुरेपुर पदरात पडणार. नाही. गोलमेज परिषदेपुढे, अन्य कोणत्याही ठिकाणी म्हणा प्रत्येक प्रसंगी मला अस्पृश्य समाजाकरिता कायदे कौन्सिलात राखीव जागा मागताना नेहमी हाच मोठा प्रश्‍न पडत असे. पण अस्पृश्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा व दिवसेदिवस वृद्धिंगत होणारी ज्ञानलालसा ह्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे मला धीर येत असे. गेल्या काळाशी तुलना केली असता आज अस्पृश्य समाजास उपलब्ध असलेली ज्ञानार्जनाची साधने व परिस्थितीत पडलेला फरक ही पाहिली असता आपल्याला एक प्रकारची उमेद येते असे त्यांनी सांगितले. याचवेळी आपल्या स्वत:च्या आयुष्यातील मनोरंजक पण बोधप्रद असा एक अनुभव त्यांनी निवेदन केला. आपण जेव्हा इंग्रजीचा अभ्यास करण्यास मुंबईत आलो