१०-९-१९३२ अस्पृश्य समाजास शिक्षण प्रसाराची निकड - Page 353

अस्पृश्य समाजास शिक्षण प्रसाराची निकड ३०९

त्यावेळची आपली परिस्थिती त्यांनी कथन केली. ८ फूट रूदीची व १० फूट लांबीची मुंबईतील गलिच्छ वस्तीतील आपली जागा, त्यात वास्तव्य करणारी ८-१० जिवंत माणसे, खोलीच्या एका बाजूला मोरी, जवळच चूल व कोपऱ्यात व डोकीवरील माळ्यावर रचलेली लाकडे, धुराच्या कडेलोटात इतक्या माणसांचा अनेक तऱ्हेचा व्यवसाय, विद्यार्थ्यांच्या व्यासंगप्रिय संगतीचा अभाव, अशा कष्टमय परिस्थितीत अभ्यासक्रम आटोपून निरनिराळ्या परीक्षा कशा [द्याव्या ] लागल्या याचे बाबासाहेबांनी हृदयंगम वर्णन केले. आजच्या विद्यार्थीवर्गास नाना प्रकारच्या शिष्यवृत्त्या, राहण्यास [वसतीगृहे ] [व ] [विद्यार्थ्यांचा ] [सहवास ] [लाभत ] असल्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम अधिक सुकर झाला आहे. तेव्हा या संधीचा व साधनांचा पूर्ण उपयोग करून घेऊन समाजाची. [योग्यता ] [वाढविणे ] [हे ] [प्रत्येक ] तरुणाचे कर्तव्य आहे. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यास अत्यंत कळकळीचा [असा ] उपदेश केला. विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन चालू असता [त्यांनी ] [आपल्यापुढे ] [निरंतर ]

' ज्ञानार्जन “ हे एकच ध्येय: ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही. ह्या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून [ज्ञान ] [संपादन ] [करावे. ] समाजसेवेत पुढील आयुष्यात विपुल काळ आहे. विद्यार्थीदशेत व्याख्यान देऊन समाजाचे होणारे तात्कालिक हित हे [पूर्ण ] [ज्ञान ] [संपादन ] [झाल्यानंतर ] [जी ] [अनेक ] [प्रकारे ]

अधिकार प्राप्तीने सेवा करिता येऊन [समाजाचे ] [जे ] [हित ] [साधता ] [येईल ] [त्या ] [हिता- ]

पेक्षा शतपटीने हिणकस आहे. या [तत्त्वांची ] [पूर्ण ] [जाणीव ] [ठेवून ] [शिक्षण ] [प्राप्ती ] [हेच ] आपले सध्याचे ध्येय [ठेवावे ] [असे ] [त्यांनी ] [विद्यार्थ्यांस ] [मोठ्या ] [कळकळीने ]

सांगितले. नंतर मंडळाने आपल्याला आज जी [सुसंधी ] [प्राप्त ] [करून ] [दिली ]

त्याबद्दल त्यांनी मंडळाचे आभार [मानिले ] [व ] [मंडळाच्या ] [कामात ] [यंश ] [चिंतून ] [आपले ]

भाषण संपविले. नंतर रा. डी. व्ही. प्रधान यांचे भाषण [झाले. ] त्यांनी मंडळाच्या

कार्यकर्त्यांच्या उत्साहाबद्दल आनंद [व्यक्‍त ] [करून ] [लोकशिक्षणाचे ] [काम ] [वर्तमानपत्रे ]

कशी करितात ते विशद करून [व ] [अस्पृश्य ] [समाजाचे ] [मुखपत्र ] [म्हणून ] [आज ] [काम ]

करीत असलेले ' जनता-पत्र [' ] सर्व अस्पृश्य [जनतेने ] [कसे ] [मनोभावाने ] [वाचले ]

पाहिजे हे सांगून त्याचा [प्रसार ] [म्हणजेच ] [लोक ] [शिक्षणाचा ] [प्रसार ] [होय, ] [असे ] [बजाविले ]

व याकरिता ' जनते ' च्या वर्गणीदारांची संख्या [वाढणे ] [किती ] [अवश्य ] [आहे ] [हे ]

सांगितले. मंडळाच्या चिटणीसांनी [नंतर ] [बाबासाहेबांचे, ] [इतर ] [निमंत्रित ] [पाहुणे ]

मंडळीचे व जमलेल्या [इतर ] [सर्व ] [मंडळीचे ] [मंडळातर्फे ] [आभार ] [मानिले ] [व ] [बालिकाँच्या ]

सुस्वर गायनात बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात [आला ] [व ] [नंतर ] [सभा ]

बरखास्त झाली. | |

© ७ ©