माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . . . . मला पर्वा नाही ३१७
म. गांधी ही गोष्ट मान्य करीत नाहीत. याचे कारण या म्हणण्याची सत्यता आणि न्याय्यता त्यांना पटत नाही असे नाही. अल्पसंख्यांकांच्या मागण्या अमान्य केल्या तर ज्याप्रमाणे शीख, मुसलमान दिल्लीवर स्वारी करतील त्याप्रमाणे अस्पृश्य वर्ग करणार नाही, अशी स्वतःची समजूत त्यांनी करून घेतली आहे. अस्पृश्यांच्या मागण्या धुडकावून लावण्याचा धीर त्यांना या समजुतीमुळे होत आहे. शिवाय गांधींचे राष्ट्रीयत्व उच्चवर्णीय हिंदुंविषयी वाटणाऱ्या आपुलकीच्या भावनेशी निगडीत झाले आहे. मुसलमान व शीख यांनी राजकीय क्षेत्रातले आपापले भाग उचलले म्हणजे उरलेला भाग खास उच्चवर्णीय हिंदूंसाठी राखून ठेवण्याचा गांधींचा खरा इरादा आहे. सज्ञान-मतदानपद्धती द्यावयाला ते कबूल आहेत यात विशेष काहीच नाही. राजकीय हक्क जर उपभोगावयास पाहिजे असतील तर खास प्रतिनिधीत्व हाच सर्वात सरळ आणि खात्रीचा उपाय आहे. सञ्ञान-मतदानपद्धती हा बेभरवशाचा व आडवळणाचा उपाय आहे... वरील मतदान पद्धतीतील ही उणीव उच्चवर्णीय हिंदुंच्या पथ्यावर पडणारी आहे, हे गांधीजींच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नसेल. अस्पृश्यांविषयी आपले हे धोरण हिंदुस्थानात असतानाच गांधींनी जाहीर केले असते तर फार बरे झाले असते. स्वतंत्र प्रतिनिधीत्वाच्या मागणीला आपण विरूद्ध आहोत असा संशयही अस्पृश्यांना येऊ दिला नाही हे दुर्दैव आहे. अस्पृश्य ही मागणी पुढे करीत आहेत हे आपल्या गावीही नव्हते असे गांधींना मुळीच म्हणता यावयाचे नाही. खरोखर अस्पृश्यांना आपले अंतःकरण त्यांनी वेळीच उघड करून दाखवावयास पाहिजे होते. यामुळे त्यांच्या किर्तीत अधिकच भर पडली असती. गांधींनी हा सरळ मार्ग स्वीकारला असता तर आपल्या. मागण्यात काँग्रेसची संमती मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न अस्पृश्यांनी केले असते. |
दुसऱ्या एका आश्चर्यकारक घटनेकडे जनतेचे लक्ष आम्हास खेचावयाचे
आहे. ज्याप्रमाणे स्वतंत्र प्रतिनिधीत्वाविषयी फक्त मुसलमान-शीखांच्या मागण्या
विचारात घ्यावयाच्या हे काँग्रेसचे मॅण्डेट होते त्याप्रमाणे काँग्रेसने या मागण्या मान्य करण्यात कोठवर पाऊल टाकावयाचे याबद्दल एक सूचनापत्रकही (Formula) ते घेऊन आले. अल्पसंख्यांकांच्या खाजगी कमिटीचे अध्यक्ष व काँग्रेसचे प्रतिनिधी या दुहेरी नात्याने मुसलमानांबरोबर तडजोड घडवून आणण्याचे [कार्य ] [त्यांच्याकडे ] सोपविले गेले. आपले प्रयत्न निष्फळ ठरले असे दर दिवशी कमिटीच्या सभासदांना ते सांगत. पण अपयशाची कारणे त्यांनी कधीच उजेडात न आणल्यामुळे, मुसलमान चौदा मुळास चिकटून बसल्यामुळे [आणि ] [म. ] [गांधी ] काँग्रेसच्या धोरणास बिलगून राहिल्यामुळे [तडजोड ] [होऊ ] [शकत ] [नाही ] [असा ]