डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३१८
सभासदांचा समज झाला. वेटेजसुद्धा मुसलमानांचे चौदाही मुद्दे गांधींनी मान्य
या प्रश्नाचा निकाल केले व मतदारसंघ संयुक्त असावेत किंवा स्वतंत्र असावेत
मुसलमान रेफरेंडमतर्फे लावून घ्यावा असे सुचविले, वगैरे गोष्टी आता बाहेर आल्या आहेत. मुसलमानांनी काँग्रेसच्या राजकीय मागण्यास पूर्ण संमती द्यावी व इतर अल्पसंख्यांकांबाबत काही ढवळाढवळ करू नये अशी अट म. गांधींनी पुढे केली व या अटीमुळेच तडजोड फिसकटली.
मुसलमानांशी तडजोडीचे बोलणे करताना गांधीजींनी काँग्रेसच्या मँडेटमध्ये इष्ट ते फरक करावे किंबहुना त्यांच्या हव्या तशा चिंधड्या उडवाव्या, पण अस्पृश्य किंवा इतर अल्पसंख्यांकांबरोबर तडजोडीचे बोलणे निघताच तेच Ase त्यांच्या तोंडावर फेकून द्यावे या सर्व गोष्टी क्षोभकारक आहेत. पण क्षोभाला वाट करून देण्यासाठी म्हणून या पत्राला आपल्या वृत्तपत्रात जागा मिळावी असे आम्ही म्हणत नाही. फक्त अस्पृश्यास स्वतंत्र प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून आम्ही चालविलेले प्रयत्न विफळ करण्यासाठी गांधीजी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करीत आहेत हे सर्वांच्या निदर्शनास यावे म्हणूनच या पत्राला प्रसिद्धी द्या अशी आमची विनंती आहे. असे करणे आम्हालाही दुःखकारक वाटते. पण अस्पृश्यांच्या हक्कास धक्का लागू नये म्हणून ताबडतोबीचे इलाज जर केले नाहीत तर अस्पृश्यांचा प्रतिनिधी या नात्याने आम्ही आमचे कर्तव्य बजावण्यास चुकलो असे होईल.
अल्पसंख्यांकांच्या सब कमिटीच्या खाजगी कमिटीचे काम पुढे चालवावयास मिळावे म्हणून सब कमिटी तहकूब ठेवावी असा जेव्हा गांधींनी ठराव आणला तेव्हा अस्पृश्यांतफ आम्ही हरकत घेतली. काँग्रेसचे आमच्याविषयी धोरण कळून चुकल्या कारणाने खाजगी कमिटीमध्ये आम्ही भाग घेतला तरी काहीच निष्पन्न व्हावयाचे नाही हे कारण आम्ही केलेल्या विरोधाच्या मुळाशी होते. पण इतर
अल्पसंख्यांकांनी अस्पृश्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्या मान्य करण्यास कॉँग्रेसचे मँडेट मला आहे असे जेव्हा गांधींनी आश्वासन दिले तेव्हा खाजगी कमिटीच्या कामकाजात भाग घेण्याचे आम्ही कबूल केले. कमिटीत मात्र आमच्या मागण्यास गांधींनी पदोपदी विरोध अर्थातच काँग्रेसच्या मँडेटास अनुसरून केला. . परंतु गांधीजी आपला विरोध भलत्याच थराला नेतील अशी आम्हाला शंका आली नव्हती. तुमचे चौदा मुद्दे मान्य केले पाहिजेत तर अस्पृश्य व इतर अल्पसंख्यांकांस विरोध करा, अशी अट गांधींनी आपल्या मुसलमान मित्रांपुढे ठेवली, असे आम्हाला खात्रीलायकरित्या कळले आहे. अस्पृश्यांबरोबर गांधींचे वर्तन मित्रत्वाचे तर नाहीच, पण प्रामाणिक शत्रुत्वाचे देखील नाही. अस्पृश्यांच्या मागण्या इतर अल्पसंख्यांक समाजांनी मान्य केल्या तर