१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 377

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . . . . मला पर्वा नाही ३३३

al निर्णय अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने

अपूरा, असमाधानकारक व अन्यायजनक

गेल्या १७ तारखेला मि. रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी हिंदू मुसलमान, शीख, खिश्चन, अस्पृश्य वगैरे समाजाच्याबाबतीत जो निकाल जाहीर केला त्याबाबत डॉ. आंबेडकर यांनी आपला अभिप्राय येणेप्रमाणे व्यक्त केला आहे--

मुख्य प्रधान मि. मॅकडोनाल्ड जो जातिविषयक निर्णय देणार तो सर्वांना सर्वप्रकारे समाधानकारक वाटेल अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती आणि त्यामुळे अस्पृश्य समाजाच्यावतीने राऊंड टेबल परिषदेमध्ये मी व माझे सहकारी मित्र रावबहादूर श्रीनिवासन यांनी अस्पृश्यांकरिता ज्या राजकीय हक्कांची मागणी केली होती ती अस्पृश्यांना तंतोतंत मिळेल अशी आशा अर्थात आम्हीही बाळगली नव्हती.” -आमच्या मागणीत थोडा फार फेरबदल होईल असे आम्हालाही वाटत होते. पण प्रत्यक्ष निर्णय पाहता त्यात केलेली छाटाछाट अत्यंत निर्दयपणाची आहे असे मला वाटते. प्रांतिक कायदे कौन्सिलात ज्या जागा आमच्या वाट्याला आल्या आहेत त्या अत्यंत अपुऱ्या असल्यामुळे अस्पृश्यांचे फारच थोडे प्रतिनिधी कायदे कौन्सिलात जाऊ शकतील व त्यामुळे त्यांचा पडावा तसा प्रभाव तेथे पडणार नाही. म्हणजेच अस्पृश्यांना आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी जितक्या कमीत कमी जागा मिळवावयाला पाहिजे होत्या तितक्याही या निर्णयाने न मिळाल्यामुळे हा निर्णय अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने पाहाता अपुरा, असमाधानकारक व अन्यायजनक समजला पाहिजे.

अस्पृश्यांच्या बाबतीत ही जी उघड विषमता व हा जो धडधडीत पक्षपात या निर्णयाच्या निमित्ताने व्यक्त झाला आहे त्याचे समर्थन कोणाला कसे करता येणार ? असला अन्याय व्हावयाला नको होता आणि त्यातल्या त्यात पंजाबच्या बाबतीत तर या पक्षपातीपणाचा कळस झाला आहे. इतर प्रांतात अस्पृश्यांना अपुऱ्या का होईनात पण काही तरी स्वतंत्र जागा मिळालेल्या आहेत पण पंजाबमध्ये अस्पृश्य समाजाच्या वाट्याला काहीही स्वतंत्र राजकीय हक्क अगर प्रतिनिधीत्व आलेले नाही आणि मला प्रत्यक्ष पंजाबची जी माहिती मिळाली आहे तिच्यावरुन पाहाता उत्तर हिंदुस्थानातील दुसऱ्या इतर प्रांतांपेक्षा पंजाब प्रांतातील अस्पृश्य समाजाची स्थिती अत्यंत वाईट आहे. अमानूष प्रकारच्या सामाजिक जुलूमाखाली व अन्यायाखाली पंजाबमधील [अस्पृश्य ] [समाज ] [चिरडून ] गेला आहे. असे असल्यामुळे पंजाबमधील अस्पृश्य समाजाला [आपल्या ] हितरक्षणासाठी व उन्नतीसाठी [स्वतंत्र ] [मतदार ] [संघाची ] [व ] [राखीव ] [जागांची ] [वगैरे ] तर खास आवश्यकता होती.