३३४ डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अशी वस्तुस्थिती असता इंग्रज सरकारने पंजाबच्या अस्पृश्यांना काहीच सवलती का देऊ नयेत हेच मुळी समजत नाही. माझ्या मते या अन्यायाचे एकच कारण दिसते आणि ते पंजाबातील इतर समाजाचा जबरदस्तपणा व अस्पृश्यांची असहाय व गरीब स्थिती हे होय. पंजाबातील इतर जबरदस्त समाजांच्या गोंगाटाला घाबरुन त्यांच्या संतोषाकरता व त्यांच्या वाटणीच्या सोयीसाठी अस्पृश्य समाजासारख्या सर्वतोपरी नाडलेल्या वर्गाला जे मिळणे अत्यावश्यक होते ते त्यांना न देता त्यांचा तो न्याय्य हिस्सा इतर समाजांना सरकारने देऊन टाकलेला आहे. हा ढळढळीत अन्याय आहे आणि खिश्चन व अँग्लो इंडियन की ज्यांची संख्या अस्पृश्यांच्या मानाने पंजाबमध्ये काहीच नाही आणि ज्यांच्यावर अस्पृश्याप्रमाणे सामाजिक जुलूम अगर अन्यायही तेथे होत नाही त्यांना मात्र स्पेशल जागा व खास प्रतिनिधी सरकारने दिलेले आहेत. या पक्षपातीपणामुळे अस्पृश्यांच्या बाबतीतील अन्यायाचे स्वरुप मात्र अधिक उघडकीस आलेले आहे.
अशाप्रकारचे अन्याय व पक्षपात या निर्णयात असल्यामुळे त्याचा विचार करण्याकरिता ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशनची जी बैठक लवकरच भरणार आहे त्या बैठकीत या निर्णयाला अस्पृश्य समाजाचा पाठिंबा मिळेल असे मला वाटत नाही. "१.
हा निवाडा जाहीर होताच त्या विरोधात गांधीजींनी ताबडतोब आमरण उपोषण करण्याचे जाहीर केले आणि आपल्या उपोषणाचा निर्णय मुख्य प्रधान जे. रॅम्से मॅकडोनाल्ड यांना ता. १८ ऑगस्ट १९३२ च्या पत्राद्वारे कळविला.
'* म. गांधीचे मुख्य प्रधानांना पत्र
येरवडा सेंट्रल प्रिझन, `
| ता. १८ ऑगस्ट १९३२.
प्रिय मित्र यास,
' अस्पृश्य ' वर्गाच्या प्रतिनिधीत्वासंबंधी मी सर सॅम्युअल होअर यांना तारीख ११ मार्च रोजी जे पत्र पाठविले, ते त्यांनी तुमच्या व मंत्रिमंडळाच्या अवलोकनात आणले असेल याबद्दल मुळीच संशय नाही. ते पत्र या पत्राचा भाग समजूनच वाचावे. | |
अल्पसंख्यांकांच्या प्रतिनिधीत्वासंबंधी ब्रिटिश सरकारने दिलेला निर्णय मी वाचला आणि त्याचा विचार करण्याचे तहकूब केले. मी सर होअर यांना जे पत्न लिहिले आणि ता. १३ नोव्हेंबर १९३१ रोजी सेंट जेम्स राजवाड्यामध्ये गोलमेज
* तत्रैव.