१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 380

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३३६

बरोबर नाही असे ठरेल. तसे म्हणून जे आहे त्यातील इतर बाबतीतही मी

चुकीचे प्रायश्चित्त आणि झाल्यास अन्नत्यागाने प्राणत्याग करणे हे माझ्या होईल त्याबरोबरच जे असंख्य स्त्रीपुरुष आज एखाद्या अर्भकाप्रमाणे माझ्या चातुर्यावर विश्‍वास ठेवीत आहेत त्यांच्यावरील एक ओझेच उचलल्यासारखे होईल. पण जर माझे मन रास्त असेल आणि तसे ते आहे याबद्दल मला तिळमात्र शंका वाटत नाही, तर मी योजलेले कृत्य हे माझ्या जीवनमार्गाचे सार्थक करणारेच होईल. पाव शतकाहून अधिक काळ मी त्याच जीवनमार्गाने चालत आलो आहे आणि त्यात मी भरपूर यश मिळविले नाही असेही नाही.

आपला विश्वस्त मित्र,

(सही) एम्‌. के. गांधी ' १

' मुख्य प्रधानांचे उत्तर

१०, डौनिंग स्ट्रीट,

ता. ८ सप्टेंबर १९३२.

प्रिय मि. गांधी, | |

तुमचे पत्र मिळाले आणि मला मोठा विस्मय वाटला आणि त्याबरोबर अत्यंत तीव्र खेदही झाला. पण असेही वाटल्याशिवाय राहिले नाही की, अस्पृश्यांसंबंधी सरकारी निर्णयात खरोखर कोणता अर्थ निघतो याबद्दल तुमचा गैरसमज होऊनच तुम्ही ते पत्र लिहिले आहे. हिंदू समाजापासून अस्पृश्य वर्गाची कायमची फाळणी करण्यास तुम्ही अगदी कडवा विरोध करीत आहा हे आमच्या ध्यानात नेहमी आहेच. तुम्ही आपले मत अल्पसंख्य मंडळापुढे व ता. ११ मार्च रोजी होअर यांना लिहिलेल्या पत्रात लख्खपणे मांडले आहे. तसेच तुमच्या मनाला हिंदू समाजातील मोठ्या वर्गाचा पाठिंबा आहे हेही आम्ही जाणत होतो आणि म्हणून अस्पृश्यांना प्रतिनिधीत्वाचे हक्क देण्याचा विचार करतेवेळी आम्ही तुमच्या मताकडे

अत्यंत काळजीपूर्वक लक्ष पुरविले.

अस्पृश्यांच्या संस्थांकडून आमच्याकडे जे अनंत अर्ज आले आणि तुम्हासही मान्य असणाऱ्या ज्या अडचणी अस्पृश्यांचे वाटेमध्ये आहेत त्या सर्वांचा आम्ही विचार केला आणि कायदेमंडळात योग्य प्रमाणात प्रतिनिधी मिळविण्याचा अस्पृश्यांचा जो हक्क आहे त्याचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्हाला वाटले. पण त्याबरोबरच अस्पृश्य समाज हिंदू समाजापासून तोडण्यात येईल असे कोणतेही कृत्य न करण्याची आम्ही खबरदारी घेत होते. कायदेमंडळात त्यांना प्रतिनिधीत्व असावे या तत्त्वाला मी विरूद्ध नाही असे तुम्हीच आपल्या ता. ११ मार्चच्या पत्रात नमूद केले आहे.

१ डॉ भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ५ वा, पृ. २२-२३.