३४० डाँ. बाबासाहेब आँबेडकर लेखन आणि भाषणे
e गांधीजींनी मुंबई सरकारला १५-९-३२ रोजी पत्र लिहून, आपण प्राणांतिक उपवास का करीत आहोत, ही भूमिका स्पष्ट केली. ते पत्र प्रसिद्धीसाठी वर्तमानपत्रांना २१ सप्टेंबरला देण्यात आले. माझा उपास फक्त अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांबाबत आहे आणि अस्पृश्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न सर्वस्वी धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळे आणि त्या प्रश्नावर मी आतापर्यंत माझे लक्ष केद्रित केले आहे आणि तो प्रश्न धसास लावणे हे माझे परमपवित्र कर्तव्यकर्म असल्यामुळे मी हा उपास करीत आहे, असा गांधींजींनी या पत्रात खुलासा केला.
“My fast has a narrow application. The Depressed Classes question being predominently a religious matter, | regard it as specially my own by reason of life-long concentration on it. Itis a sacred personal trust which | may not shirk ”. °
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, गांधीजींनी घेतलेल्या आमरण उपोषणाच्या विरूद्ध आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्रक प्रसिद्ध केले.
“' बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीर पत्रक
सर्वपक्षीय पुढाऱ्यांच्या परिषदेच्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक १९ सप्टेंबर १९३२ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी म. गांधींच्या आमरण उपोषणाच्या निमित्ताने आपली न्याय्य भूमिका विशद करणारे आणि गांधीजींचा उपवास, अस्पृश्यांचे हक्क व हितसंबंध यांच्याविरोधी कसा आहे हे दर्शविणारे पत्रक जाहीरपणे प्रसिद्ध केले. मूळ इंग्रजी पत्रकाचा हा मराठी अनुवाद--
ब्रिटिश सरकारने आपखुषीने अगर लोकमताच्या दडपणामुळे नाईलाजाने अस्पृश्य समाजाला दिलेला स्वतंत्र मतदार संघाचा हक्क जाहीरपणे जर रद्द केला नाही तर मी अन्नत्याग करुन प्राण देईन, ही गांधीजींची प्रतिज्ञा ऐकून मला खरोखरच विलक्षण आश्चर्य वाटले. महात्मा गांधींनी केलेल्या या आत्महत्त्येच्या संकल्पामुळे त्यांनी मला कसल्या विपरित व बिकट परिस्थितीत आणून सोडले आहे व माझ्यावर केवढ्या मोठ्या अरिष्टकारी जबाबदारीची घोरपड टाकली आहे याची कल्पना कोणालाही सहज होण्यासारखी आहे
ज्ञातिविषयक निर्णयाचा प्रश्न इतर प्रश्नांच्या मानाने क्षुल्लक आहे असे गोलमेज परिषदेत गांधीजी प्रतिपादन करीत होते. मग त्यांच्या मते ' क्षुल्लक ' असलेल्या या प्रश्नासाठी त्यांनी आपला एवढा मोठा प्राण पणास का लावला हे मला समजत नाही ! त्यांच्यासारख्यांच्या दृष्टीने पाहता असले जातिविशिष्ट प्रश्न म्हणजे हिंदुस्थानच्या राज्यघटनात्मकरूपी पुस्तकाला जोडण्यात येणारे ते केवळ परिशिष्ट समजले पाहिजे ! जातिविशिष्ट प्रश्न हा काही त्या पुस्तकाचा मुख्य अगर महत्त्वाचा भाग समजला जात नाही. हिंदुस्थानला पूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या मुद्यावर गांधीजींनी राऊंड टेबल परिषदेत केवढा तरी जोर दिला होता व या गोष्टीचा केवढा मोठा आग्रह धरला होता! अशा या
* डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, पू. २६.