माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . . . . मला पर्वा नाही ३४१
राजकीय स्वातंत्र्यासारख्या मोठ्या प्रश्नासाठी गांधीजींनी जर आपला प्राण पणास लावला असता तरे ते रास्त तरी दिसले असते. पण राजकीय स्वातंत्र्यासारखे खुद्द त्यांच्याच मते मोठमोठ्या महत्त्वाचे असलेले अनेक प्रश्न तसेच टाकून अस्पृश्यांच्या मतदानाचा एक क्षुल्लक प्रश्न त्यातून मुद्दाम त्यांनी वेचून घ्यावा व त्याचे निमित्त करून आपला प्राण पणास लावावा ही गांधीजींची कृती म्हणजे तापदायी आश्चर्याचा एक उद्वेगजनक व खेदजनक नमुना आहे. स्वतंत्र मतदारसंघ एकट्या अस्पृश्य समाजालाच मिळाला आहे असे नाही. इंडियन खिश्चन, अँग्लो इंडियन यांना त्याचप्रमाणे मुसलमान, शीख यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर जमीनदार वर्ग, मजूर वर्ग
व व्यापारी वर्ग यांच्याकरिताही खास अगर स्वतंत्र मतदारसंघाची योजना करण्यात
आली आहे. अगदी आरंभी फक्त मुसलमान व शीख सोडून बाकी सर्वाच्या स्वतत्र मतदारसंघास गांधीजींनी हरकत घेतली होती व विरोध केला होता. आता केवळ मुसलमानास अगर शीखांसच नव्हे तर अस्पृश्यांबरोबर जमीनदार, व्यापारी, अग्लो इंडियन, खिश्चन वगैरे वर्गासही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आहेत. गांधीजींना जर आता विरोधच करावयाचा होता तर त्यांनी तो निदान या सर्वाच्या स्वतंत्र मतदारसंघांना करावयास पाहिजे होता. पण त्या सर्वांना त्यांनी सोडले व एकट्या अस्पृश्य समाजाला मिळालेल्या या सवलतीचे निमित्त करून त्या योजनेविरूद्ध मात्र आपला प्राण पणास लावण्याचा संकल्प त्यांनी कायम केला.
अस्पृश्य समाजाला काही काळ स्वतंत्र मतदारसंघ दिल्याने मोठे अनर्थ कोसळतील अशाप्रकारची गांधीजींनी आपली जी भीतिप्रद समजूत करून घेतली आहे ती निव्वळ काल्पनिक आहे. मुसलमानांना व शीखांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्याने जर राष्ट्राचे तुकडे उडतात असे गांधीजींना वाटत नाही व त्या बाबतीत जर ते कबूल होतात तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्याने हिंदू समाजाची शकले होतील असे सांगून या योजनेला प्राण जाईपर्यंत विरोध करणे गांधीजींना न्यायाचे अगर सुसंगतपणाचे कसे वाटले ? अस्पृश्य वर्गाखेरीज इतर समाजांना
व वर्गाना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले असता त्याविरूद्ध गांधीजींची सद्सदविवेक
बुद्धी उठावणी करीत नाही, पण एकट्या अस्पृश्यांना मिळालेल्या या सवलतीमुळे मात्र त्यांचीही सद्बुद्धी खडबडून जागी होते व प्राण इरेस घालून त्याविरूद्ध बंड Tard या न्यायनिष्ठुरपणाला काय म्हणावे ?
येऊ घातलेल्या स्वराज्याच्या अमदानीत बहुसंख्यांक वर्गाच्या जुलूमापासून अल्पसंख्यांक समाजाचे संरक्षण होण्यासाठी राजकीय हक्कांच्या खास सवलती जर कोणत्या एखाद्या समाजाला सर्वाच्या आधी व सर्वाच्या अधिक प्रमाणात मिळणे अत्यावश्यक असेल तर तो अस्पृश्य समाज होय. ही गोष्ट विचारी माणसाला पटलेली आहे अशी मला खात्री वाटते. अस्पृश्य समाज हाच एक असा वर्ग आहे की, सभोवार चाललेल्या जीवनकलहाच्टा तीव्र झगड्यात टिकाव धरून जगण्यास त्याच्यापाशी बिलकूल त्राण नाही. ज्या धर्माचा त्याने आश्रय घेतला आहे व ज्या