१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 387

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . .... मला पर्वा नाही ३४३

चालविलेली ही काही पहिलीच धडपड नव्हे. अल्पसंख्यांकांचा करारनामा (मायनॉरिटी पँक्ट) अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच अस्पृश्यांना राजकीय सत्ता यत्किंचितही मिळू नये म्हणून मुसलमानांना हाती धरून गांधीजींनी खटपट करून पाहिली. अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला विरोध करण्यासाठी तुम्ही मला हातभार लावा म्हणजे मी तुमच्या चौदाच्या चौदा मागण्या मान्य करतो अंशी खलबते गांधीजींनी मुसलमानांबरोबर केली! पण मुसलमान प्रतिनिधींच्या चांगुलपणामुळे गांधीजींचा तो प्रयत्न फसला. असल्या कृष्ण कारस्थानास पाठिंबा देण्याचे मुसलमानांनी नाकारले. मुसलमान जर गांधीजींना वश झाले असते तर अस्पृश्यांचा दुहेरी कोंडमारा झाला असता. गांधीजींच्या व मुसलमानांच्या विरोधी कात्रीत अस्पृश्य समाज सापडला असता, पण मुसलमान प्रतिनिधींनी गांधीजींची साथ करण्याचे नाकारल्यामुळे अस्पृश्य समाजावरील हे दुर्धर अरिष्ट टळले.

ज्ञातिविषयक निर्णयाला गांधीजींचा विरोध का असावा याचाच मुळी मला उलगडा होत नाही. गांधीजी म्हणतात की, या निर्णयामुळे अस्पृश्य समाज हिंदू समाजापासून विभक्त पडतो ! पण डॉ. मुंजे तर काही असे म्हणत नाहीत | आणि डॉ. मुंजे म्हणजे कट्टे हिंदू व मोठे लष्करी बाण्याचे हिंदू हितसंरक्षक समजले जातात ! विलायतेहून आल्यानंतर डॉ. मुंजेंनी जी व्याख्याने दिली त्या सर्वातून त्यांनी असा ध्वनी काढला आहे की, ब्रिटिश सरकारने दिलेल्या ज्ञातिविषयक निर्णयामुळे अस्पृश्य समाज हा हिंदू समाजापासून मुळीच अलिप्त झालेला नाही. उलट डॉ. मुंजे तर अशी बढाई मारीत आहेत की, ब्रिटिश सरकारने दिलेला हा निर्णय त्यांच्यासारख्यांच्या प्रयत्नाचे फल आहे व अस्पृश्य समाजाला राजकीयदृष्ट्या हिंदू समाजापासून अलिप्त करण्याचा डॉ. आंबेडकरांचा जो प्रयत्न होता तो ब्रिटिश सरकारने दिलेल्या या निर्णयामुळे फसला! या निर्णयामुळे अस्पृश्य समाज हा हिंदू समाजापासून विभक्त होत नाही. या घटनेचे श्रेय डॉ. मुंजे म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या स्वतःकडे जरी जात नसले तरी ते जे म्हणतात हे काही खोटे नाही. ब्रिटिश सरकारने दिलेल्या या निर्णयामुळे डॉ. मुंजे म्हणतात त्याप्रमाणे मलाही वाटते की, अस्पृश्य समाज हिंदू समाजापासून राजकीयदृष्ट्याही विभक्त पडला जात नाही. असे असता या निर्णयामुळे अस्पृश्य समाज हिंदू समाजापासून अलिप्त पडतो ही गांधीजींची भीती निराधार व खोटी आहे. जी भीती डॉ. मुंजेसारख्या कट्टर हिंदू सभावाल्यांच्या दृष्टीला दिसत नाही ती भीती गांधीजीसारख्या राष्ट्रीय समजण्यात येणाऱ्या [पुढाऱ्यांच्या ] दृष्टीला भासमान व्हावी व हिंदुंच्या हिताचे रक्षण करण्यासाठी या [मुद्यावर ] [त्यांनी ] आपला प्राण पणास लावण्यास उद्युक्त व्हावे हे खरोखरीच मोठे चमत्कारीक गूढच समजले पाहिजे ! डॉ. मुंजेसारख्यांना देखील [ज्या ] [निर्णयात ] [वेगळेपणाचे ] भूत दिसत नाही त्या निर्णयात ते असल्याचा गांधीजींनी तर [मग ] [नुसता ] [संशयही ] घ्यावयाला नको आहे.