माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . ...... मला पर्वा नाही ३४५
भयंकर अपुरी आहे आणि रावबहादूर राजा याच कमिटीचे एक सभासद होते! सरकारने दिलेल्या जातिविषयक निर्णयात अस्पृश्यांना कमी जागा मिळाल्या याबद्दलच्या दोषांचे खापर आमच्या माथी फोडण्यापूर्वी आपण स्वत: सेंट्रल कमिटीचे सभासद. असताही वरील भयानक काट आपण बिनबोभाट कशी करू दिली व त्यावेळेस आकाशपाताळ एक का करून सोडले नाही याचा , रावबहादूर राजापाशी समाधानकारक असा काय खुलासा आहे ? अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळणे हा अस्पृश्य समाजाचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो त्याला आत्मरक्षणासाठी पूर्णत: मिळणे ही अगदी आवश्यक व न बदलणारी अशी घटना आहे असे जर रावबहादूरांना वाटत होते तर मग तसे झालेच पाहिजे असा आग्रह धरून तो शेवटास नेण्याची सेन्ट्रल कमिटीचा सभासद म्हणून त्यांना जी संधी लाभली होती तिचा लाभ त्यांनी का करून घेतला नाही ?
सरकारने दिलेल्या निर्णयामुळे अस्पृश्य समाजाचा हिंदू समाजापासून तुकडा पाडण्यात आला या रावबहादूर राजाच्या तक्रारीत माझ्या मते काही अर्थ नाही. (डॉ. मुंजेना देखील तसे वाटत नाही). स्वतंत्र मतदारसंघाविरूद्ध रावबहादूर राजासारख्यांची सद्सद्विवेकबुद्धी जर हरकत घेत असेल तर स्वतंत्र मतदारसंघात उमेदवार राहण्याची अगर मत देण्याची जबरदस्ती या निर्णयामुळे त्यांच्यावर केली जात नाही. संयुक्त अगर सार्वत्रिक मतदारसंघात उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभे राहण्याचा व मत देण्याचा असे दोनही हक्क या निर्णयाने त्यांच्यासारख्यांना देऊन ठेवले आहेत व त्याचा अनुभव घेण्याची त्यांना पूर्ण मुभा आहे. हिंदुंच्या दृष्टिकोनात आमुलाग्र बदल झाला आहे व अस्पृश्यांच्या बाबतीत या अवघ्या सहा सात महिन्यात (ते डॉ. मुंजेंना मिळाल्यापासून) स्पृश्य हिंदुंचे विलक्षण मतपरिवर्तन घडून आले असे रावबहादूर राजा अगदी आक्रोशपूर्वक व वेशीवर उभे राहून सर्वांना सांगत सुटले आहेत. या त्यांच्या 'नव्या सांगण्यावर ज्या अस्पृश्य लोकांचा विश्वास बसत नाही व जे स्वतंत्र मतदार संघाची मागणी करतात अशा लोकांची खात्री पटण्यासाठी तरी रावबहादूर राजासारख्यांनी संयुक्त मतदारसंघात उभे राहून निवडून येण्याची व स्वतंत्र मतदारसंघाची अस्पृश्यांना आवश्यकता नाही असे त्यायोगे [सिद्ध ] करून दाखविण्याची ही संधी मुळीच दवडू नये. अस्पृश्य समाजाविषयी आम्हाला प्रेम वः सहानुभूती वाटते असे म्हणणाऱ्या [हिंदूंना ] [देखील ] [रावबहादूर ] [राजासारख्यांना ] निवडून देऊन आपल्या म्हणण्याची [सत्यता ] [पटवून ] [देण्याची ] [संधी ] [या ] [निर्णयातील ] व्यवस्थेमुळे प्राप्त झालेली आहे.