१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 393

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . . . . मला पर्वा नाही ३४९

विचार करण्याजोगी याहीपेक्षा चिंतेची गोष्ट म्हटली म्हणजे गांधीजी आपल्या या कृत्यामुळे हिंदू जनतेतील अनिवार व मुर्दाड अशा विकारांना मोकाट सोडून राहिले आहेत. स्पृश्य व अस्पृश्य यामधील द्वेषबुद्धीची त्यांच्या या कृत्यामुळे खच्ची न होता उलट वृद्धि होणार आहे. उभय समाजातील परकेपणाचे अंतर भरून निघण्याऐवजी या प्रकारामुळे ते अधिक वाढणार आहे. कारण गोलमेज परिषदेत अस्पृश्यांच्या वतीने गांधीजींच्या धोरणास मी विरोध करताच माझ्याविरूद्ध या देशात सर्वत्र एकच गिल्ला करण्यात आला. "राष्ट्रीय ' म्हणविल्या जाणाऱ्या सर्व उच्चवर्णीय हिंदू पत्रकारांनी व देशभक्तांनी मला ' राष्ट्रद्रोही ' वगैरे अनेक शिव्या देण्याचा व माझ्याविषयी करता येईल तितका गैरसमज उत्पन्न करण्याचा जणू काय विडाच उचलला होता. माझ्याविरूद्ध सर्व अस्पृश्य समाज आहे असे जगाला भासविण्यासाठी स्पृश्यवर्गीय हिंदू सुधारकांनीसुद्धा नाना तर्‍हेच्या खोट्या संस्था निर्माण केल्या व कधी न भरलेल्या सभांचेही मोठमोठे बनावट रिपोर्ट तयार करून ' राष्ट्रीय ' पत्रातून त्यांना प्रसिद्धी देण्याची चढाओढ चालविली. माझ्या वत्तीने येणाऱ्या तारा व पत्रव्यवहार दडपून टाकण्याचा व त्यांना प्रसिद्धी न देण्याचा सर्व ' राष्ट्रीय ' पत्रांनी जणू काय कटच केला होता.

अस्पृश्य वर्गातील काही लोकांना ' सिल्व्हर बुलेट ' (द्रव्या) चे आमिष दाखवून माझ्याविरूद्ध ओरड करण्यास उभे करण्यात आले. काही ठिकाणी स्पृश्य व अस्पृश्य समाजात झटापटी होऊन थोडेफार रक्तपातही झाले, हे सर्व अनिष्ट व अनर्थकारी प्रकार पूर्वपिक्षाही मोठ्या प्रमाणात घडावे अशी गांधीजींची इच्छा नसल्यास त्यांनी कृपा करून या सर्व गोष्टींचा शांतपणे फेरविचार करावा व भावी अनर्थ परंपरां टाळावी. असे घडावे हे गांधीजींना पाहिजे असेल असे मला वाटत नाही. पण जर त्यांनी आपली ही प्राणघातकी प्रतिज्ञा मागे घेतली नाही तर आपल्या या कृतीचे भयंकर परिणाम घडू नयेत अशी त्यांची कितीही इच्छा असली तरी तिचा काही उपयोग होणार नाही. दिवस मावळल्यावर रात्र यावी हे जितके स्वयंसिद्ध आहे तितकेच गांधीजींच्या या प्रतिज्ञेचे पर्यवसान शेवटी अत्याचारात व सर्व प्रकारच्या अनर्थात व्हावे हे स्वाभाविक आहे. शेवटी सर्व जनतेच्या निदर्शनास एक गोष्ट मी प्रामुख्याने आणू इच्छितो आणि ती ही की, या बाबतीत कोणाशीच चर्चा करण्याचे मला कारण नाही असे म्हणण्याचा जरी मला पूर्ण हक्क असला तरी केवळ गांधीजींसाठी म्हणून या प्रश्‍नाच्या बाबतीत त्यांच्या कोणत्याही ' नव्या योजनेचा विचार करण्यास मी तयार आहे आणि [मला ] [आशा ] [वाटते ] [की, ] गांधीजींचा प्राण व माझ्या लोकांचे हक्क या [दोहोंपैकी ] [कोणत्या ] [तरी ] [फक्त ] [एकाच ] गोष्टीची निवड करण्याचा दुर्धर व नाजूक [प्रसंग ] [गांधीजी ] [माझ्यावर ] [येऊ ] [देणार ] नाहीत. कारण तसाच प्रसंग आल्यास मी कोणत्या [गोष्टीची ] [निवड ] [करीन ] [हे ]