३५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
योजनेशिवाय आपणास स्पष्ट असे मत प्रदर्शित करता येत नाहीं असेच सांगितले. मि. पी. बाळू यांच्या अंगी खरेच स्वाभिमानाची इतकी उणीव असेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. स्पृश्य जनतेपुढे नम्रता प्रगट करण्याची सीमा सोडून झालेले त्यांचे भाषण फोल होते. त्यांना आपण ओव्हर बाऊन्डरी मारली की काय असे वाटले असावे. मद्रासचे शिवराज, मि. नटराजन, मि. दळवी, मि. मंडल, मि. करंदीकर, डॉ. मुंजे, सौ. गोखले, पंडित कुझरु वगैरे पुढाऱ्यांची भाषणे झाली. मुंबईतील पुढाऱ्यांचे एक शिष्टमंडळ पुण्यास म. गांधीजींची भेट घेण्यास व त्यांचे म्हणणे हिंदू पुढाऱ्यांच्या परिषदेस कळविण्यासाठी गेले होते. त्यांच्या आगमनानंतर म. गांधीजींच्या मिळणाऱ्या निरोपानुसार पुढील कार्यक्रम आखण्याचे ठरवून परिषदेची बैठक दुसऱ्या दिवसापर्यंत तहकूब ठेवण्यात आली
सोमवारी पहिल्या दिवसाची बैठक संपल्यानंतर रात्री पुण्यास गेलेले शिष्टमंडळ आले. या शिष्टमंडळाची व तेजबहादूर सप्रू बॅ. जयकर, सी. राघवाचार्य, मि. बिर्ला वगैरे मंडळीबरोबर रात्री १२ वाजेपर्यंत बिर्ला हॉलमध्ये विचारविनिमय झाला. या खाजगी बैठकीत म. गांधीजींच्या नवीन योजनेची चर्चा झाली.” १
'' मंगळवार २० सप्टेंबर १९३२ ला दुपारी बाराचे ठोके पडल्यावर गांधीजींनी उपवास सुरु केला, तेव्हा त्यांनी तेथेच वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना मुलाखत देऊन आपण प्राणांतिक उपास का करणार आहोत, याबद्दल खुलासा केला. तो ' टाइम्स ऑफ इंडियाच्या ' २१ सप्टेंबरच्या अंकात प्रसिध्द झाला होता. आपला प्राणांतिक उपास मानवी धर्माच्या संरक्षणार्थ (A fight for humanity ) असे त्यांचे म्हणणे होते, माझा उपास अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नसावेत म्हणून आहे. अस्पृश्यांना घटनात्मक राखीव जागा द्याव्यात याविरुध्द नाही. ( My
fast is only against separate electorates and not against statutory reservation of seats ) i
" वाटाघाटी करण्यासाठी सर तेजबहादूर सप्रू बॅ. जयकर, पंडित मालवीय, मथुरादास वसनजी यांची स्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी म्हणून समिती नेमण्यात आली होती. या दिवशी बॅ. जयकरांकडून डॉ. आंबेडकर यांना सकाळी दहा वाजता बिर्ला हाऊसमध्ये आगाऊ बोलविण्यात आले. त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर, डॉ. सोळंकीबरोबर गेले. बिर्ला हाऊसमध्ये बॅ. जयकर, तेजबहादूर सप्रू व पंडित मदनमोहन मालवीय यांच्याबरोबर म. गांधीजींच्या नवीन योजनेवर चचा झाली व ह्या नवीन योजनेच्या आधारावर केवळ तडजोड म्हणून एक तात्पुरती योजना ठरविण्याचे ठरले. l
१ जनता : २४ सप्टेबर १९३२.
२ भी. रा. आंबेडकर चरित्र: चां. भ. खैरमोडे, खंड ५ वा., पु. ४२.