१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 397

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . . . . मला पर्वा नाही ३५३

दुपारी बरोबर बारा वाजता दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरवात

झाली. परंतु आज विशेष चर्चा न करता एक लहानशी कमिटी नेमून तडजोडीने

निर्माण होणारा निर्णय तयार करावयाचा असे आगाऊच ठरले होते. प्रथम

पुण्यास गेलेल्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधीपैकी सर चुनिलाल मेथा यांनी

म. गांधीजींच्या नवीन तडजोडी विषयीचा निर्णय परिषदेपुढे मांडिला. आज

बैठकीला सर तेजबहावूर सप्रू जयकर वगैरे मंडळी हजर होती. अध्यक्ष पंडित

मालवीय यांनी सभेला सुरुवात करण्यापूर्वी सभेचे काम शक्य तितक्या आटोपशीर-

रितीने पार पाडण्यासाठी व निष्कारण अधिक चर्चा न करता पुढील जबाबदारीच्या

कामासाठी एक लहानशी कमिटी नेमून परिषद पुन्हा तहकूब करणे किती

आवश्यक आहे हे सर्वांना पटवून दिले. नंतर सर चुनिलाल यांनी म. गांधीजींचे म्हणणे पुढीलप्रमाणे परिषदेपुढे मांडले,

(१) म. गांधी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या निर्णयाविरुध्द

आहेत. |

(२) तसेच संयुक्त मतदार संघ व राखीव जागा या योजनेला सर्वस्वी

कबूल नाहीत. तरीपण मुंबईस भरलेल्या अखिल हिंदुंच्या परिषदेत राखीव

जागासंबंधी एक ठराविक निर्णय तयार केल्यास त्याला माझी हरकत नाही,

पण त्याला मान्यता आहेच असे म्हणता येणार नाही. एखादा Uae ठरलाच

तर मग मी कदाचित माझी अनुमती देईन. मध्यंतरी सर चुनीलाल यांनी

राखीव जागाविषयी समाधानकारक खुलासा न केल्यामुळे सर सेटलवाड यांना

स्पष्ट खुलासा करणे भाग पडले होते.

महात्मा गांधीजींच्या योजनेनंतर डॉ. आंबेडकर हे बोलावयास उठले. त्यांचे आजचे भाषण फारच तडफदार व हृदयस्पर्शी असे झाले. ते म्हणाले,

आजच्या बिकट परिस्थितीच्या वाटाघाटीत माझी सर्वाच्यापेक्षा फारच चमत्कारिक स्थिती आहे. शांततेच्या ह्या सर्व तडजोडीत दुर्दैवाने केवळ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी मला खलनायकाची भूमिका घेण्याची पाळी येत आहे. माझ्या न्याय्य व लोकहिताच्या कामगिरीमध्ये मला कितीही त्रास झाला, इतकेच नाही तर जवळच असलेल्या एखाद्या रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर मला कोणी तात्काळ फाशी दिली तरी मी त्याची मुळीच पर्वा बाळगणार नाही. आजचा प्रश्‍न नुसता भावनांना वश होऊन सोडविण्याचा नसून गुलामगिरीत खितपत असलेल्या असंख्य समाजबांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सनदशीर मार्गाने सोडवावयाचा प्रश्‍न आहे. येथे नुसता सद्सदविवेक बुध्दीचा विचार करून भागणार नाही ; आणि म. गांधींची योजना विचारात घेता तिचा विचार करण्यासाठी थोडासा कालावधी लागेल. तरी महात्मा गांधींना परिषदेने ठराव करून १०-१२ दिवस उपोषण करण्याचे थांबविण्यास सांगणे. परंतु अध्यक्ष पंडित मालवीयजींनी ती गोष्ट अगदीच अशक्य असल्याचे सांगितले.