१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 398

३५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

याप्रमाणे आपण सर्वस्वी स्वतंत्र मतदार संघ सोडण्यास तयार नाही असे डॉ. आंबेडकर यांनी सांगितले. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तरी स्वतंत्र मतदार संघ असल्याखेरीज तडजोड होत नाही हे ल्यावेळी सर्वाना कळून चुकले आणि म्हणून सायमन कमिशनचे सभासद मेजर अँटले यांनी सायमन कमिशनच्या रिपोर्टास जोडलेल्या मतपत्रिकेत मुसलमान लोकांचा स्वतंत्र मतदारसंघ टाळण्याकरिता प्रायमरी निवडणुकीची जी योजना केली होती ती मान्य करण्यात आली. यानंतर स्वतंत्र मतदारसंघ सोडून दिल्याबद्दल अस्पृश्य वर्गाच्या होणाऱ्या नुकसान भरपाईकरिता आपल्याला कम्यूनल अवार्डपेक्षा जादा सवलती मिळाल्या तरच आपण तडजोड करू असे डॉ. आंबेडकर यांनी कमिटीच्या सभासदांना सांगितले व कमिटीने आपण त्यांचा विचार करू असे अभिवचन दिले.

चर्चा त्वरित करण्यासाठी मालवीयजींनी एक लहानशी कमिटी नेमण्याविषयी सुचविले व तिची नावे त्यांनी परिषदेला कळविली. या कमिटीत सर तेजबहादूर सप्रू, बॅ. जयकर, पंडित मालवीय, मथुरादास वसनजी व डॉ. आंबेडकर यांचा समावेश करण्यात आला.

डॉ. आंबेडकरांनी आपली सर्व योजना लिहून आणावी व रात्री नऊ वाजता पुन्हा कमिटीची बैठक बिर्ला हॉलमध्ये भरावी असे ठरले. त्याचप्रमाणे जर डॉ. आंबेडकर यांची योजना पसंत पडली तर बुधवारी सकाळी डॉ. आंबेडकर व कमिटीचे सभासद यांनी पुण्यास जाऊन म. गांधींपुढे ती मांडावी. मध्यंतरी कमिटीच्या सभासदांनी डॉ. आंबेडकर यास प्रथमत: पुण्यास आपल्याबरोबर न नेता आपणच अगोदर जाऊन महात्माजींबरोबर वाटाघाट करावी व महात्माजींनी इच्छा प्रदर्शित केल्यास डॉ. आंबेडकर यांना मागाहून बोलावून घेऊ अशाप्रकारचा महत्त्वाचा फेरबदल दोन प्रहरी ठरलेल्या कार्यक्रमात केला.

कमिटीने रात्री विचारविनियम केल्यावर डॉ. आंबेडकर यांनी एक नवीन योजना तयार केली. ते व डॉ. सोळंकी रात्री १० वाजता बिर्ला हाऊसमध्ये गेले आणि आपली योजना समितीच्या लोकांपुढे सादर केली. तिला कमिटीने मान्यता दिली. ती योजना पुढीलप्रमाणे,

डॉ. आंबेडकर यांची नवीन योजना

भाग पहिला

महात्मा गांधींचा निश्चित निर्णय कळल्यावर डॉ. आंबेडकर यांनी सर तेजबहादूर सप्रू जयकर व पंडित मालवीयजी यांच्या संमतीने नवीन योजना तयार केली. या योजनेत मुख्यत्त्वेकरून प्राथमिक निवडणूक, नंतर संयुक्त मतदार संघातून राखीव जागांच्या धर्तीवर निवडणूक, हे स्वतंत्र मतदार संघाला