३५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बहिष्कृत वर्गात योग्य शिक्षण प्रसार होण्यासाठी प्रत्येक प्रांतातून शिक्षणाची जी सरकारी ग्रॅन्ट दिली जाते त्यातून अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या मानाने त्या रकमेतील योग्य वाटणी देण्यात यावी.
कॅनडा (Constitution of Canada) वसाहतीमध्ये ज्याप्रमाणे व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेप्रमाणे शिक्षण, नोकऱ्या व आरोग्य वगैरे प्रश्नांच्या बाबतीत अस्पृश्य वर्गाला न्याय न मिळाल्यास त्यांना गव्हर्नरकडे व व्हाइसरॉयकडे अर्ज करून न्याय्य हक्क मिळविण्याचा नवीन राज्यघटनेत अधिकार ठेवण्यात येईल.
महात्मा गांधीबरोबर मुलाखत
त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर व डॉ. सोळंकी हे जेव्हा रात्री आपली वरील योजना घेऊन बिर्ला हाऊसमध्ये गेले तेव्हा “ तुम्ही दिलेली ही योजना आम्ही आताच्या आता पुण्यास घेऊन जातो व महात्माजींना दाखवितो व महात्माजींना जरूर वाटून तुम्हास बोलवावे अशी जर त्यांनी इच्छा दर्शविली तर तुम्हास मागाहून बोलावू .“ असे सांगून कमिटीची मंडळी लागोलाग रात्रीच्या शेवटच्या गाडीने पुण्यास गेली. म. गांधी व मुंबईहून गेलेले सभासद यांच्या बुधवारी सकाळी गाठीभेटी झाल्या व त्यात महात्माजींनी डॉ. आंबेडकरांशी प्रत्यक्ष वाटाघाट करण्याची इच्छा दर्शविली आणि त्याप्रमाणे बिर्ला हाऊसमधून डॉ. आंबेडकर यांना दामोदर हॉलमध्ये बुधवारी १.३० वाजता टेलिफोनहून ' तुम्हास म. गांधी पुण्यास तातडीने बोलावित आहेत ' असा संदेश सांगण्यात आला. त्यास उत्तर: म्हणून, ' आपण गुरुवारी सकाळी पुण्यास येऊ ' असे उत्तर डॉ. आंबेडकर यांनी पाठविले. त्याबरोबरच इतर कोणाही अस्पृश्य पुढाऱ्यांशी आपण वाटाघाट करणार नाही, फक्त म. गांधींशी करु असेही त्यांनी स्पष्ट कळविले. ठरल्याप्रमाणे बुधवारी रात्री बाराच्या गाडीने डॉ. आंबेडकर व डॉ. सोळंकी म. गांधींशी वाटाघाट करण्याकरिता पुण्यास गेले.
डॉ. आंबेडकर यांनी हिंदुस्थानातील सर्व प्रांतीय अस्पृश्य पुढाऱ्यांना तारा करून तातडीने बोलाविले. त्याप्रमाणे मद्रासचे प्रसिद्ध पुढारी रा. ब. श्रीनिवासन हे काल रोजी मुंबईस येऊन तसेच मद्रास मेलने पुण्यास गेले. त्यांच्याबरोबर श्री. शिवतरकरही गेले आहेत. “ १
“ पुणे कराराच्या वाटाघाटी चालू असता बाबासाहेबांच्या भूमिकेमुळे सर्व देशभर त्यांच्याबद्दल कलुषित वातावरण उत्पन्न झाले. त्यांना धमकीची पत्रे
१ जनता : १ आक्टोबर १९३२.