१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 401

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . .... मला पर्वा नाही ३५७

येऊ लागली. त्यापैकी एक पत्र गुजराथीत होते. ते १-१०-३२ च्या जनता

पत्रात (पा. ३) छापले होते, ते असे :--

डॉ. आंबेडकर यांना खुनाच्या धमकीचे पत्र

डॉ. आंबेडकर,

जो तमे दिवस ४ मां महातमा गांधीनी मागणी मंजूर करशो नही तो तमारी

जान लोवामां आवशे. माटे जो तमारूं जीवन तमोने वहालुं होय तो महातमा

गांधीजीनी मागणी मंजूर करीने ते ओने उपवास मांथर जलदी छोडावो. आ

चेतवणी छेल्ली छे हवे जुदी तकरार छोडी देशो नही तो तमारी खून करवामां आवशे.

ली. हरिभाई के. भट

B. P. ६. E. ना एक मेंबर अने वर्कर

पुण्यातील काही स्पृश्य वर्गीय तरुणांनी बाबासाहेबांना ठार करण्याचा गुप्त कट केला होता. त्याचा वृत्तांत २४-९-३२ च्या जनतेत (पा. ८) दिलेला होता तो असा :-

डॉ. आंबेडकरांवरील प्राणसंकट

पुणेरी विद्यार्थ्यांची गुप्त सभा. खुनाची धमकी

पुणे , ता. २३-९-३२, रात्रीचे आठ. |

(जनतेच्या खास प्रतिनिधीने पाठविलेली बातमी) .

दोन दिवस झाले, सारखी वाटाघाट चाललेली आहे. डॉ. आंबेडकरांना दबविण्यासाठी नानातऱहेचे प्रयोग सुरू आहेत. गव्हर्नरवर गोळी घालणाऱ्या गोगटे पंथाच्या काही पुणेरी विद्यार्थ्यांची गुप्त कारस्थाने चालल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. डॉ. आंबेडकराला नाहीसे केले म्हणजे सर्व भानगडी मिटतील व . गांधीजींचाही जीव वाचेल, अशा अर्थाचे संकेत चालले आहेत. डॉ. आंबेडकरांच्या कानावर ही बातमी घातली तेव्हा ते क्षणभर हसले. ' अशा भ्याड मृत्यूला मी घाबरत नाही ' असा त्यांच्या त्या निर्भय हास्याचा अर्थ होता. येथील अस्पृश्य समाजास मात्र डॉ. आंबेडकर साहेबांच्या सुरक्षेबद्ल मोठी काळजी वाटत [असून ] ` त्यांनी ती दक्षता ठेवलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका HATS जरी