३५८ Si. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
धक्का पोहचला तरी भयंकर अनर्थ ओढवल्याशिवाय राहणार नाही. हजारो अस्पृश्य तरुण त्यांच्या रक्ताच्या एका थेंबाकरिता बलिदान करण्यास सज्ज होतील. गांधीजींच्या या दुर्दैवी प्रतिज्ञेचा शेवट अशा काही भयंकर परिणामात होऊ नये, असेच सर्वांना वाटत आहे."
“ गुरुवार ता. २२ सप्टेंबर १९३२ रोजी सकाळी नऊ वाजता नॅशनल हॉटेलमध्ये सर तेजबहादूर सप्रू व बॅ. जयकर हे उभयता डॉ. आंबेडकर यांना भेटावयास आले व नऊ वाजल्यापासून १२.३० वाजेपर्यंत उभयतः चर्चा झाली. त्यात प्रथमतः असे सांगण्यात आले की, डॉ. आंबेडकर यांनी सादर केलेल्या योजनेत स्वतंत्र मतदारसंघ गाळण्यात आला असला तथापि त्यांनी योजिलेली प्रायमरी इलेक्शनची कल्पना म. गांधींना सर्वस्वी मान्य नाही. कारण तिला स्वतंत्र मतदारसंघाची घाण येते असे महात्माजींचे मत आहे असे सांगण्यात आले. याशिवाय स्वतंत्र मतदारसंघापुरती उभयपक्षात तडजोड झाली तर मुख्यमंत्री मि. रॅम्से मॅकडोनाल्ड यांना तार करून स्वतंत्र मतदारसंघाची योजना ताबडतोब रद्द करण्यास सांगावी व अस्पृश्यांच्या वतीने केलेल्या मागण्यांचा विचार पुढे केव्हा तरी करू, कारण विचारविनिमय करण्यास कालावधी लागणार आहे व तोपर्यंत महात्माजींचा उपवास चालू राहिल्यास त्यांच्या जीवितास धोका पोचण्याचा संभव आहे असेही सांगण्यात आले. त्यावेळी डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले की, आपल्या सगळया मागण्यांचा विचार ताबडतोब होऊन त्यातून आपल्याला काय मिळते हे कळल्याखेरीज अस्पृश्य वर्गाला प्राप्त झालेला स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क सोडण्यास आपण केव्हाही तयार होणार नाही. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागावयास आपली कवूली नाही. त्याचप्रमाणे महात्मा गांधींनी किमानपक्षी प्रायमरी इलेक्शनची योजना मान्य केल्याशिवाय आपण तडजोडीस तयार होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. या पहिल्या वाटाघाटीत तडजोडीच्या आशेची चिन्हे फारशी दिसत नव्हती. इतके झाल्यानंतर डॉ. सप्रू व बॅ. जयकर हे निघून गेले व तुमचे म्हणणे कमिटीच्या सभासदांस आपण कळवितो व सर्वांच्या अनुमतीने तुमची व महात्माजींची मुलाखत व्हावी असे जर ठरले तर आम्ही तुम्हाला कळवू असे सांगून ते गेले. प्रथमतः. चार वाजता म. गांधीजींची मुलाखत घ्यावयाची असे ठरले ; परंतु कमिटीच्या सभासदांशी वाटाघाट केल्यामुळे महात्माजीस थकवा आला आहे व त्यांना विश्रांती मिळावी म्हणून अंमळ उशीरा या असा निरोप येरवड्याच्या