१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 404

३६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उमेदवारापैकी सहा सात जणांना तरी निदान अखेर निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार असावा असा आग्रह होता. डॉ. आंबेडकर यांचा आग्रह तीनपेक्षा जास्त नसावा असा होता. अखेर बऱ्याच वादविवादानंतर उभयपक्षांनी चार ही संख्या मान्य केली व हा प्रश्‍न मिटविण्यात आला. त्यानंतर मध्यवर्ती मंडळात अस्पृश्यांचे किती प्रतिनिधी असावेत हा प्रश्‍न विचारात घेण्यात आला. प्रथमतः लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे सगळ्या लोकसंख्येचे प्रमाण किंवा wea हिंदू लोकसंख्येचे प्रमाण या प्रश्‍नाची चर्चा झाली. त्यात अस्पृश्य वर्गाला प्रतिनिधी वाटताना हिंदुंच्या लोकसंख्येशी त्यांच्या लोकसंख्येचे जे प्रमाण पडेल त्याप्रमाणे प्रतिनिधींची वाटणी करण्यात. यावी असा आग्रह कमिटीच्या हिंदू सभासदांचा होता. आम्हाला सर्व लोकसंख्येशी आमच्या लोकसंख्येचे जे प्रमाण पडेल त्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले पाहिजेत असा आग्रह डॉ. आंबेडकर यांचा होता. राजा-मुंजे करारात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी देण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे तुम्ही आता वचन पाळले पाहिजे व अल्पसंख्यांकांच्या करारापेक्षा राजा-मुंजे करारात लोकसंख्येच्या प्रमाणान्वये जादा प्रतिनिधी मिळतात अशी भूलथाप लोकांना देऊन आमच्यातील काही लोकांना संयुक्त मतदार संघास तुम्ही अनुकूल करुन घेतले. अर्थात तुम्ही दिलेले वचन पाळणे हे तुमचे कर्तव्यकर्म आहे वगैरे मुद्दे डॉ. आंबेडकरांनी मांडले. त्यात एक आश्चर्याची गोष्ट निष्पन्न झाली ती अशी--डॉ. आंबेडकरांनी जेव्हा वरील मुद्दा मांडला तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की, राजा-मुंजे करारात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी देऊ असे जे ठरले होते त्यांत लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे हिंदुंच्या लोकसंख्येशी प्रमाण, सर्वसाधारण लोकसंख्येशी नव्हे. सभेत डॉ.मुंजे नव्हते व मि. राजा यांना येऊ दिले नव्हते. तेव्हा कराराचा अर्थ या दोघांनी काय घेतला होता हे आपल्यास निश्‍चितपणे सांगता येत नाही तथापि मि. राजा यांनी वारंवार जी कोष्टके प्रसिद्ध केली आहेत त्यावरुन त्यांचा तरी समज अखिल लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळावयाचे असा होता असे आपणास वाटते असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले. त्याला उत्तर म्हणून असे सांगण्यात आले की, नुकतीच रा. ब. राजा यांच्याबरोबर हया प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यात आली होती व त्यात डॉ. मुंजे यांच्याशी जो करार केला त्यातील लोकसंख्येचे प्रमाण है हिंदुंच्या लोकसंख्येचे प्रमाण अशी आपली समजूत आहे असे त्यांनी सांगितल्याचे कमिटीत जाहीर करण्यात आले. रा. ब. राजा व त्यांच्या पार्टीचे लोक हे किती पराधीन व परवश झाले होते हे एका गोष्टीवरुन सहज कळून येण्यासारखे आहे. हिंदुंशी संगनमत करण्याकरिता अस्पृश्यांचे राजकीय हक्क बुडाले तरी