माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . . . . मला पर्वा नाही ३६१
बुडोत या एकाच धोरणाने ते लोक प्रेरित झाल्याचे दिसते. कारण रा. ब. राजा यांनी लोकसंख्येच्या प्रमाणाच्या बाबतीत जी नवीन मखलाशी केली ती शुद्ध ल्वाडीची होती याबद्दल काही शंका नव्हती व ती लबाडी सिद्ध करण्यास डॉ. आंबेडकर यांना फार वेळ लागला नाही. शेवटी सर्वसाधारण जागांपैकी १८ टक्के जागा अस्पृश्यांना मध्यवर्ती कायदे कौन्सिलात राखून ठेवाव्यात असे ठरले व हा प्रश्न मिटविण्यात आला. त्यानंतर अस्पृश्यांचा संयुक्त मतदार संघ व राखीव जागा किती काळपावेतो राहावयाच्या व त्या कोणत्या अटीवरती नष्ट व्हावयाच्या हा प्रश्न चर्चेत घेण्यात आला. या प्रश्नावर अनपेक्षित असे रण माजले. हिंदू पुढाऱ्यांचे असे मत होते की, ही सवलत दहा वर्षानी आपोआप नाहीशी व्हावी. डॉ. आंबेडकरांचे म्हणणे असे होते की, ती निदान १५ वर्ष तरी अस्तित्वात राहावी व त्यानंतर ती काढावयाची झाल्यास अस्पृश्य वर्गाच्या मतदार लोकांची मते घेऊन त्यांनी ती आपणास नको असा बहुमताने निर्णय दिला तरच ती काढण्यात यावी नाहीतर ती तशीच चालू ठेवण्यात यावी. दोन प्रहरी दोन वाजल्यापासून ती रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मोठ्या कडाक्याचा व खडाजंगी असा वाद झाला व शेवटी कोणताच पक्ष माघार घेण्यास तयार झाला नसल्यामुळे तडजोड अगदी फिस्कटण्याच्या बेतात आली. शेवटी या प्रश्नासंबंधाने महात्माजींपुढे उभयपक्षाने आपापली बाजू मांडावी व ते काय म्हणतील ते पाहावे असे ठरले व त्याप्रमाणे रात्री ९.३० वाजता सर्व मंडळी येरवड्याच्या तुरूंगामध्ये महात्माजीस भेटावयास गेली. प्रथमतः डॉ. आंबेडकरांनी आपली बाजू मांडली व नंतर हिंदूंची बाजू पंडित मदनमोहन मालवीय यांनी मांडली. आश्चर्याची गोष्ट ही की, उभयपक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महात्माजींनी आपले मत डॉ. आंबेडकर यांच्यातफने दिले. हा निर्णय ऐकल्यानंतर वादाचा एक मोठाच प्रश्न मिटून गेला व मंडळी रात्री ११.३० वाजता जेलमधून परत शिवलाल मोतीलाल यांच्या बंगल्यावर आली आणि उरलेल्या प्रश्नाचा विचार दुसऱ्या दिवशी सकाळी करु असे ठरवून सभेचे काम रात्री सुमारे १२.३० वाजता तहकूब करण्यात आले.
शनिवार २४ सप्टेंबर १९३२
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पुन्हा सभेच्या कामास सुरवात झाली. वादाचा मोठा असा काही प्रश्न उरला नसल्यामुळे लवकरच समेट होऊन करारनामा तयार करण्यात येईल असे सर्वांनाच वाटले होते. परंतु अगदी सुरवातीलाच वादाला अतिशय तीव्र स्वरुप आले. इतके की सारे प्रकरण