३६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पुन्हा चिघळले. हिंदू लोकांचा हट्ट असा होता की, सुरुवांतीपासून पहिल्या पाच वर्षानंतर अस्पृश्य लोकांचा स्वयंनिर्णय (Referendum) घेण्यात यावा व त्यांनी जर ही सवलत काढून टाकण्याच्या विरूद्ध निर्णय दिला तर आणखी पाच वर्षे ती सवलत चालू ठेवून पुढे ती आपोआपच पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी नष्ट करण्यात यावी. डॉ. आंबेडकरांचे म्हणणे असे होते की फार तर पहिल्या दहा ' वर्षानंतर स्वयंनिर्णय घ्यावा. पाच वर्षानंतर स्वयंनिर्णय घेण्याच्या मुद्यास त्यांनी कबूली देण्याचे नाकारले. तसेच काही काळाने ही सवलत आपोआप अस्पृश्य लोकांच्या स्वयंनिर्णयाशिवाय जावी या तत्त्वास त्यांनी जोराचा विरोध केला. केव्हाही काढावयांची झाल्यास अस्पृश्य लोकांचा स्वयंनिर्णय घेतल्याशिवाय ती केव्हाही काढली जाऊ नये. येथे देखील सर्वांची मति कुंठली व समेट होऊ शकत नाही असे सर्वांस वाटले. पुन्हा एकदा महात्माजींची भेट घेऊन आपले म्हणणे त्यांच्यापुढे मांडून त्यांचे मत काय आहे हे जाणण्याची आपली इच्छा आहे असे डॉ. आंबेडकरांनी दर्शविले. त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर, राजगोपालाचारी व मि. बिर्ला असे तिघेजण साडे अकरा वाजता येरवड्याच्या तुरुंगात महात्माजीस भेटण्यास गेले. डॉ. आंबेडकरांनी आपले म्हणणे महात्माजींपुढे मांडल्यानंतर महात्माजींनी सांगितले की, अस्पृश्यांना दिलेल्या राजकीय सवलती त्यांच्या स्वयं- निर्णयाशिवाय काढल्या जाऊ नयेत या तुमच्या मागणीस माझी पूर्ण संमती आहे. फक्त पहिला स्वय॑निर्णय पाच वर्षांनी घ्या एवढेच आपले सांगणे आहे. माझा जीव तुमच्या हाती आहे. सर्वच बाबतीत तुमचे म्हणणे मी मान्य केले आहे. एवढ्या एका बाबतीत माझे म्हणणे तुम्ही ऐकणार नाही का ? असे ते म्हणाले. त्यानंतर डॉ. आंबेडकर वगैरे मंडळी शिवलाल मोतीलाल यांच्या बंगल्यावर आली व घडलेली हकीकत त्यांनी कमिटीच्या सभासदांना सांगितली. ऑडॉ. आंबेडकरांनी शेवटी असे सांगितले की, महात्माजींचे म्हणणे ऐकून त्यावर आपण पूर्ण विचार केला आहे. विचारांती दहा वर्षाच्या अगोदर स्वयंनिर्णय घेण्यास आपली तयारी नाही असे सांगितले, पुन्हा तडजोडीच्या कार्यात अडचण उत्पन्न होऊन वादाला वाढ लागली. शेवटी तास दीड तास पुन्हा वाद झाल्यानंतर शेवटी असे ठरले की, दिलेल्या सवलती केव्हा जावयाच्या यास कोणत्याच प्रकारची मुदत घालण्यात येऊ नये. उभय पक्षांच्या संमतीने निराळी योजना ठरेतोपर्यंत दिलेल्या सवलती निर्वेधपणे चालू राहाव्यात असे ठरले व ही योजना उभय पक्षास मान्य झाल्याने हा वाद संपला. त्यानंतर प्रांतिक कायदे कौन्सिलात अस्पृश्यांना किती जागा द्यावयाच्या एवढाच वाद शिल्लक राहिला होता. डॉ. आंबेडकरांनी आपल्या नवीन योजनेत १९७ जागा मागितल्या होत्या. हिंदू लोकांतफं १२३ जागा द्याव्या असे म्हणणे होते. शेवटी देवाण-घेवाण होऊन १४८ जागांवर उभयपक्षांची तडजोड झाली. त्यानंतर