१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 407

माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी . . . . ... मला पर्वा नाही ३६३

डॉ. आंबेडकर यांनी आपल्या योजनेच्या दुसऱ्या भागात केलेल्या मागण्यांचा विचार करण्यात आला. ज्या दुराविक भाषेत त्या लिहिल्या आहेत त्या ठराविक भाषेत आपल्याला आज संमती देता येत नाही. तथापि त्या मागण्यातील जे मूलभूत तत्त्व आहे त्या मूलभूत तत्त्वाला आपली कबुली आहे व ती कबुली दर्शविणारा एक मसुदा तयार करुन आपण तो करारनाम्यात समाविष्ट करण्यास आपण तयार आहोत असे हिंदू पुढाऱ्यांतफे सांगण्यात आले. तूर्त एवढ्यानेच आपण समाधान मानून घेण्यास तयार आहोत असे डॉ. आंबेडकरांनी सांगितल्यामुळे हाही प्रश्‍न

लवकरच निकालात निघाला. एवढे सगळे होता होता दुपारी दोन

वाजले. त्यानंतर मंडळी करारनाम्याचा मसुदा करावयास बसली. सुमारे चार वाजता मसुदा तयार झाला. त्यानंतर करारनाम्यावर सह्या कोणी कराव्या याची वाटाघाट झाली. रा. ब. राजा व त्यांच्या पक्षाच्या मंडळींनी करारावर सह्या करू नयेत असा आग्रह मद्रासहून आलेल्या अस्पृश्यांच्या सर्व पुढाऱ्यांनी धरला व त्यांनी जर सह्या केल्या तर आपण सह्या करणार नाहीच नाही पण डॉ. आंबेडकर यांना सुद्धा आपण सही करू देणार नाही असा हेका धरला. त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर व त्यांच्या पक्षातील पुढाऱ्यांच्या सह्या होऊन करारनामा तयार झाला. तो झाल्यानंतर इतर स्पृश्य हिंदू पुढाऱ्यांनी डॉ. आंबेडकरांना विनंती केली की रा. ब. राजा वगैरे मंडळींना सही करू देण्यास तुम्ही काही तरी खटपट करा. शेवटी भवति न भवति होता असे ठरले की, त्यांनी सर्वाच्या सह्या झाल्यानंतर अस्पृश्य वर्गातील व्यक्ती म्हणून सही करावी. अस्पृश्य वर्गातील एका पक्षातील पुढारी म्हणून प्रमुख ठिकाणी त्यांनी सह्या करू नयेत. त्याप्रमाणे राजा-गवई वगैरे मंडळीस टेलिफोन करून सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या बिल्डिंगमधून बोलविण्यात आले व सर्वाच्या सह्या झाल्यानंतर शेवटी सह्या करण्याची त्यांना परवानगी देण्यात आली. आश्चर्याची गोष्ट ही की, सर्वांच्या मागून आले असताना देखील व अगदी वरती जागा नसताना देखील जयकर व सप्रू यांच्यामध्ये आपली सही घुसडून देण्याचा रा. ब. राजानी लघळपणा केलाच. सह्या होऊन करारनामा तयार झाल्यानंतर पंडित मदनमोहन मालवीय व डॉ. आंबेडकर या दोघांच्या सहीने मुख्य प्रधानाला करार झाल्याची तार करण्यात आली व करारातील ठळक गोष्टींचा उल्लेख करणारी एक तार त्याच्यासोबत पाठविण्यात आली. डॉ. आंबेडकर व रा. ब. श्रीनिवासन यांनीही आपल्या सहीच्या तारा प्रधान सेक्रेटरी ऑफ स्टेट, व्हाइसरॉय यांना करुन करार आपणास संमत असल्याची बातमी दिली. त्यानंतर कराराची एक अस्सल नकल घेऊन डॉ. आंबेडकर, सर तेजबहादूर सप्रू जयकर व सर चुनिलाल मेथा यांनी मुंबई सरकारचे होम सेक्रेटरी मि. क्ली यांना संध्याकाळी सात वाजता दिली व ती सरकारी रीत्यानुरुप प्रधानांना पाठवून द्या अशी विनंती