१९-९-१९३२ माझ्या लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील कंदिलाच्या खांबावर कोणी फाशी दिली तरी त्याची मला पर्वा नाही - Page 408

३६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

करण्यात आली. तेथून सर्व मंडळी येरवडा जेलमध्ये महात्मा गांधींना भेटावयास गेली. भेटीत महात्मा गांधींनी करारासंबंधी आपले समाधान व्यक्त केले व तडजोड केल्याबद्दल डॉ. आंबेडकर व इतर पुढाऱ्यांचे आभार मानले.

नवीन करारातील कलमे

(१) अस्पृश्यांना सर्वसाधारण मतदारसंघात सर्व प्रांतात मिळून लोकसंख्येच्या प्रमाणात १४८ राखीव जागा पुढीलप्रमाणे द्याव्या :- ति ee RE a po “क कज तान

प्रांत अस्पृश्यांना कायदे-

जागा मंडळातील

हिंदुंच्या जागा

O (२) (३)

बंगाल 04 हि - 30 ८० मुंबई सिंधसह हि हा = १५ १०८ बिहार व ओरिसा T $3 ass १८ ११४ मद्रास sà > i 30 १५३

पंजाब ee ri si ८ ४३

मध्य प्रात व वन्हाड .. ee i २० ८८ आसाम i Ht a ७ ५७ संयुक्त प्रांत D or he 20 १४४

१४८ ७८७ RR शीण oe oo Oe क प AY

अशा तन्हेने या समेटान्वये अस्पृश्यांना हिंदुंच्या एकंदर ७८७ जागापैकी १४८ जागा देण्यात येणार आहेत. | |

(२) या सर्व राखीव जागाकरिता अस्पृश्यांचे जे प्रतिनिधी निवडावयाचे त्यांची प्राथमिक निवड, प्रथम केवळ अस्पृश्यवर्गीय मतदारांनी प्रत्येक जागेकरिता ४ उमेदवार याप्रमाणे निवडलेल्या उमेदवारांतून केली जावी व तद्नंतर या चारांच्या पॅनेलमधून एक प्रतिनिधी स्पृश्यास्पृश्य सर्व मतदारांनी निवडून द्यावा. प्राथमिक निवडणुकीत प्रत्येक अस्पृश्यवर्गीय मतदारास मत देण्याचा अधिकार आहे.

(३) मध्यवर्ती कायदेमंडळात अस्पृश्यांचे प्रतिनिधी सर्वसाधारण मतदारसंघात राखीव जागासाठी पॅनेलच्या निवडणुकीने निवडले जावे.

(४) मध्यवर्ती कायदेमंडळात ब्रिटिश हिंदुस्थानातील अस्पृश्यांना हिंदुंच्या जागापैकी १८ टक्के जागा द्याव्या.

(५) अस्पृश्य उमेदवारांच्या पॅनेलची ही पद्धती wad १० वर्षच अंमलात राहावी. पण तत्पूर्वी सर्व जातींनी एकमताने ती रद्द करावयाचे ठरविल्यास तसे करण्यास हरकत नाही.