२५-९-१९३२ पुणे करारनामा बंधनकारक समजून स्पुश्यबंधुंनी कृती करावी - Page 413

पुणे करारनामा . . . . . . बंधुंनी कृती करावी ३६९

तर आजचे बिकट व भयानक असे वातावरण कधीच उत्पन्न झाले नसते. असो. ह्या यशस्वी करारनाम्याला मान्यता देण्यात मला आनंद होतो. माझ्या स्पृश्य बंधुंनी हा करारनामा बंधनकारक समजून त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृतीत कार्य करून दाखविल्यास मला .व माझ्या समाजाला अत्यानंद होणार आहे. या -करारनाम्याच्या यशाचे श्रेय म. गांधींशिवाय सर: तेजबहादूर सप्रू पंडित मालवीय व सी. राजगोपालाचारी यांना दिल्याशिवाय मला राहावत नाही.

डॉ. आंबेडकर यांच्या भाषणानंतर रा. ब. राजा व मि. के. नटराजन यांची भाषणे झाल्यावर श्री. सी. राजगोपालाचारी यांचे आभार प्रदर्शनार्थ भाषण झाले. पुढील विधायक काँमकाजाकरिता जी कमिटी नेमावयोची तिच्याबद्दल सर्वस्वी अधिकार अध्यक्षांना असावा अंशी सूचना शेठ मथुरादास वसनजी यांनी केली व तिला सेभेने मान्यता दिल्यावर परिषंद बरखास्त करण्यात आली. |