देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही ३७१
नंतर बाबासाहेब बोलावयास उठले. जवळजवळ पंधरा हजारांचा तो प्रचंड जनसमूह टाळ्यांच्या कडकडाटात एकदम मग्र झाला. डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,
आठ दिवसांपूर्वी अस्पृश्य समाजावर कोणत्या प्रकारचे संकट आले होते त्याचा खुलासा अध्यक्षांनी आपल्या भाषणात केलाच आहे. त्या संकटातून अस्पृश्य समाज बाहेर पडला इतकेच नव्हे तर या संकटामुळे शक्तिहीन न होता तो आज अधिकच बलवत्तर झोला आहे
राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी आपण अस्पृश्यांकरिता काही खास मागण्या केल्या होत्या त्या सर्वास विदितच आहेत. दुसऱ्या अधिवेशनात ज्या वेळेस अस्पृश्यांच्या मागण्यांचा प्रश्न निघाला त्यां ade सर्व हिंदू प्रतिनिधींनी व खुद्द म. गांधींनी देखील त्या मागण्यास कसून विरोध केला व अस्पृश्यांस संरक्षणासाठी' काही सवलती मिळतील असा रंग दिसेना पददलितांसारख्या सर्व : बाजूने नडलेल्या, आर्थिकदृष्ट्या पंगू झालेल्या, धार्मिकदृष्ट्या कमकुवत . बनलेल्या, सामाजिकदृष्ट्या कसपटाप्रमाणे लेखल्या गेलेल्या व राजकीयदृष्ट्या निर्माल्यवत् बनलेल्या अशा समाजास काही सवलती देण्यास जर हिंदू समाज तयार होत नाही तर भावी स्वराज्यात म्हणजे ज्या राज्यात राजकीय सत्तेचा बहुतांश वाटा हिंदुंच्या हातात जाणार त्या राज्यात त्या दुर्बल अस्पृश्य समाजाची काय गत होणार, ही मला मोठी शंका उत्पन्न झाली व मी सर्वास स्पष्ट बजाविले की, जर भावी स्वराज्यात अस्पृश्य वर्गास जरूर असलेल्या सवलती मिळत नसतील, तर त्या स्वराज्यास अस्पृश्य समाज आपली संमती कदापि देणार नाही. दुसऱ्या अधिवेशनात अस्पृश्यांकरिता मी मागण्या सादर केल्या व त्य़ा मुख्य प्रधानांजवळ रूजू केल्या. तरीपण मुख्य प्रधानांचा जो निवाडा जाहीर झाला त्यात मी मागितलेला स्वतंत्र मतदार संघ काही जागांकरिता आपल्यास देण्यात आला होता. आपल्या मागणीप्रमाणे जरी सर्व जागा आपल्यास मिळाल्या नव्हत्या तरी त्यात समाधान मानण्यास जागा होती व आता
आपण पुढील कार्यास लागावे, अशा विचारात मी होतो. संकटाला तोंड देऊन
अस्पृश्य समाजाकरिता थोडेबहुत कार्य आपल्या हातून झाले, याबद्दल मला थोडासा संतोष वाटत होता व जीव खाली पडला होता, फार कशाला वन्य पशूंच्या तावडीतून सुटून एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादे हरीण स्वस्थचित्त होते त्याचप्रमाणे माझी मनःस्थिती झाली होती. इतक्यात
गांधींची घोर प्रतिज्ञा कानी आली. अस्पृश्यांच्या सुदैवाने यावेळी मात्र अस्पृश्यांच्या मागण्यास महात्माजींचा विरोध न होता त्यांचा मला पुष्कळ वेळी उपयोग झाला. महात्माजींनी पुष्कळच मिळतें घेतले व हिन्दू पुढाऱ्यांशी जो आपला तहनामा झाला त्यात अस्पृश्यांचा फायदाही झाला. पंजाब प्रांतात