८-१०-१९३२ भोळसट कल्पनांमुळे इहलोकातील खडतर आयुष्यक्रम कष्टमय झाला आहे - Page 419

भोळसट कल्पनांमुळे . . . .. . कष्टमय झाला आहे ३७५

असते की, ती अजाण बालकांनी किंवा अज्ञ खेडवळानेही ती ग्रहण करावी. इतके असूनही प्रत्येक शब्द व मुदे एखाद्या कुशल कायदेपंडिताप्रमाणेच मांडले जातात. खुनाकरिता फासावर लटकवल्या जाणाऱ्या आरोपीची केस रंगविताना कुशाग्रबुद्धीचा वकील ज्याप्रमाणे आपली बाजू ज्युरीस समजावून देण्याकरिता मांडीत असतो, त्याचप्रमाणे ते कोणताही विषय श्ओत्यांस समजावून देतात. ज्ञानाभिलाषी पठीक विद्यार्थ्यास सहज विषय विशद करून देण्याची त्यांची हातोटी अज्ञ श्रोत्यांसही कोणताही विषय समजावून देताना सहज प्रतिबिंबित होते. शनिवारी रात्री झालेले त्यांचे भाषण असेच संस्मरणीय झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

मरणोत्तर मोक्षप्राप्तीकरिता तळमळणारी वृत्ती किवा काल्पनिक स्वर्गीय . नंदनवनाकडे खिळलेली दृष्टी ही आजच्या परिस्थितीत आत्मघातकी आहे. इहलोकातील खडतर आयुष्यक्रम त्या भोळसट कल्पनांमुळे, कष्टमय झाला आहे. स्वपराक्रमाने पोषक अन्न मिळविणे, ज्ञानार्जनाची साधने अंकित करणे व इतर प्रकारे जीवितक्रम सुखकर करणे या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांकडे बहुजन समाज पराङमुख झाल्यामुळे सर्व देशाची उन्नती स्थगित झाली आहे हे रोजच्या आयुष्यक्रमातील अनुभवावरून स्पष्ट होते. गळ्यातील तुळसीमाला तुम्हास मारवाड्याच्या कैचीतून मुक्त करण्यास उपयोगी पडत नाही किंवा तुम्ही रामनामाचा जप करता म्हणून घरवाला भाड्याची सूट देत नाही अगर वाणी आपले पैसे कमी करत नाही. तुम्ही पंढरीचे वक्तशीर वारकरी आहा म्हणून तुमचा _ मालक तुम्हास पगारात वाढ देत नाही. समाजातील अत्यंत मोठा भाग या मूढ कल्पनात गढून गेल्यामुळे काही आपमतलबी माणसांचा कावा [साधतो ] व [ते ] [तुम्हाला ] सर्वथैव नाडून आपला डाव साधतात. तेव्हा तुम्ही यापुढे तरी अत्यंत सावधगिरीने वागले पाहिजे. आज तुम्हाला थोडीबहुत राजकीय सत्ता प्राप्त होत आहे. त्या सत्तेविषयी जर तुम्ही उदास राहाल, आपली आजची स्थिती बदलण्याकरिता योग्य उपाययोजना न कराल तर तुमचे हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत. ' येरे माझ्या मागल्या आणि ताक [कण्या ] [चांगल्या ] [' ] [ही ] [एक ] [मराठीत ] म्हण आहे. _ त्याप्रमाणे जर तुम्ही वागाल तर तुमची [कधीच ] [ऊजितावस्था ] [होणार ] नाही. या प्रकाराची उदासीनता व मनाची [प्रवृत्ती ] ही [तुमच्या ] [ऊजितांवस्थेत ] अत्यंत विघातक आहे आणि मला [मोठी ] [शंका ] [येते ] [ती ] [हीच ] [की, ] [आज ] [आपल्यात ] जागृती होत आहे ती क्षणिक ठरून जर [विराम ] [पावली ] [तर ] [काय ] [? ] [ज्या ] गुलामगिरीस नेस्तनाबूत करण्यास आज [आपण ] [सज्ज ] [झालो ] [आहो ] [तिचा ] [पगडा ] परत तुमच्यावर बसणार नाही [ना ] [? ] [आजपर्यंत ] [वैष्णवपंथी ] [संतजनांनी ] [तुम्हास ] समानतेच्या पायरीवर आणण्याचा [प्रयत्न ] [केला. ] परंतु त्यांची शिकवणूक [सर्वस्वी ]