४-११-१९३२ आपल्यातील भेद मोडणेच इष्ट - Page 426

३८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

या शहरात घाण साचून त्यामुळे रोगाचा फैलाव होईल, पण अशा परोपकारी कामाचा मोबदला काय ? तर आपलेच हे हिंदू लोक आपणाला गुलामगिरीत ठेवीत आहेत. आपणाला स्वतंत्र मतदार संघ मिळाला म्हणून माझे मित्र म. गांधी यांनी उपोषणाला आरंभ केला. त्याचाच परिणाम हा आहे की, हे लोक गांधींसाठी देवळे उघडी करावयास लागले आहेत. पण ही चळवळ अळवावरच्या पाण्यासारखी आहे. ती ओसरून जाईल म्हणून या लोकांवर तुम्ही भरवसा ठेवू नका. आपणाला सामाजिक दर्जा समानतेच्या पायावर मिळावावयाचा आहे. आपली आर्थिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे याकरिता आपण आपल्या पायावर उभे राहून संघटना केली पाहिजे. आपले शील विकून पोट भरणारे लोक तुम्हाला निरनिराळया वेळी थापा देतील. त्यापासून सावध रहा व आपल्या मनाला पटेल तेच करा. शेवटी आपणाला हेच सांगावयाचे की हिंदू लोकांना जातीभेद मोडावयास ज्याप्रमाणे आपण सांगतो त्याप्रमाणे आपणही आपल्यातील भेद मोडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. असो. आपण गला मानपत्र देऊन माझा जो गौरव केलात त्याबद्दल मी पुन्हा आपले आभार मानून आपली रजा घेतो.

७ ७ ७