४-११-१९३२ ऐक्याने वागल्यास भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहिशी करील - Page 427

६३
ऐक्याने वागल्यास भावी राजकारण
आफली गुलामगिरी नाहिशी करील

शुक्रवार, ता. ४ नोव्हेंबर १९३२ रोजी रात्रौ श्री. गजोबा दुधवले यांनी मराठी भाषा बोलणाऱ्या. अस्पृश्य लोकांची सभा बालपाखाडी येथे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तिसऱ्या राउन्ड टेबल कॉन्फरन्सला जातात म्हणून प्रेमाचा निरोप देण्याकरिता भरविली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गुजराती बंधुंच्या सभेला गेले होते म्हणूनच ते येईपर्यंत रामचंद्र अडांगळे यांचा राऊन्ड टेबल कॉन्फरन्सवरील जलसा लोकांच्या मनोरंजनार्थ चालू होता. गुजराती बंधूंच्या सभेहून बरोबर ११ वाजता डॉ. आंबेडकर साहेब, सोळंकी, शिवतरकर, चित्रे, फणसे, झकेरिया, मणियार, उपशाम, रेवजी डोळस, मडके बुवा, गायकवाड, वगैरे अस्पृश्य पुढाऱ्यांसह आले. आल्यावर थोडा वेळ जलशातील गाणी ऐकल्यावर ते खुश झाले. नंतर नियोजित अध्यक्ष डॉ. सोळंकी साहेब म्हणाले, बंधुभगिनींनो, आपण डॉ. आंबेडकर साहेबांच्या तोंडचे शब्द ऐकण्यास उत्सुक झाला आहात हे आपल्या चर्येवरून समजते म्हणून मी भाषण न करता डॉ. आंबेडकर साहेबांस आपणास जाते वेळचा संदेश सांगण्यास विनंती करतो. नंतर डॉ. आंबेडकर साहेब हे प्रचंड टाळ्यांच्या गजरात भाषण करण्यास उठले. ते म्हणाले,

बंधुभगिनींनो

आपणाला जे राजकीय हक्क आता मिळालेले आहेत ते कशाच्या जोरावर मिळाले तर आपल्या संघशक्तीच्या जोरावर मिळाले आहेत. राउन्ड टेबल कान्फरन्समध्ये जेव्हा माझा व म. गांधी यांचा तीव्र मतभेद झाला तेव्हा म. गांधींची समजूत त्यांच्याभोवती लांगूलचालन करणाऱ्या लोकांनी अशी करून दिली होती की, डॉ. आंबेडकर म्हणजे महार जातीतील एक पोर आहे. त्यांच्या पाठीशी त्यांच्या ऑफिसातील चार-दोन माणसांशिवाय कोणी नाही. पण म. गांधी राउन्ड टेबल कान्फरन्सहून मुंबईला आले त्यावेळी sors पियर बंदरावर अस्पृश्य वर्गातील २० हजार बंधुभगिनींनी त्यांचे काळे बावटे दाखवून स्वागत केले तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि म्हणू लागले की, विलायतेमध्ये व येथे माझी माझ्याच अनुयायांनी दिशाभूल करून मला फसविले. डॉ. आंबेडकर यांच्या पाठीशी अस्पृश्यांचा प्रचंड लोकसमुदाय आहे अशी माझी खात्री करून दिली असती तर मी त्यांच्या मागण्यांना विरोध केला नसता. . माझ्या मित्रांनी व

जनता : १९ नोव्हेंबर १९३२.