३८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खड्यासारखे एका बाजूला निवडून काढतील. आपले भांडण सत्तेच्या वाटणी बद्दल होईल आणि त्या भांडणात आमचा हिस्सा आम्हाला मिळाला पाहिजे. महाभारतात कौरवपांडव युद्ध झाले पण त्यात भिष्माचार्याला पांडवांची खरी बाजू माहीत असून तो कौरवांचे अन्न खात असल्यामुळे त्यांच्याच बाजूला राहणे भाग पडले. अर्थात 'अर्थस्य पुरुषो दास: अशी स्थिती तुमची होऊ देऊ नका. लोकांचे डाव ओळखा व त्याप्रमाणे वर्तन ठेवा. जी गोष्ट वाईट होते ती ईश्वर करतो. ईश्वरानेच आपणाला अस्पृश्यांच्या जन्माला घातले आहे. ही देवाची इच्छा आहे. ही भावना काढून टाका. तुम्ही सध्या ईश्वरासंबंधी विचारच करू नका. आपले वाईट झाले ते इतर लोकांनी आपला स्वार्थ साधला व आपले नुकसान केले म्हणून, गेल्या जन्मातील पातकामुळे नव्हे. महाराला जमीन नाही याचे कारण त्या इतर लोकांनी घेतल्या म्हणून. अस्पृश्यांना नोकऱ्या. नाहीत. याचे कारण इतर लोकांनी लुबाडल्या म्हणून. हे जे बरेवाईट होते ते सुधारणे आपल्या शक्तौबाहेरचे नाही. याला रेल्वेचेच उदाहरण घेऊ. रेल्वेचा कारभार व्हाइसरॉयच्या कायदे कौन्सिलामार्फत चालतो. रेल्वेतून कामगार कमी करावयाचे असले तर पहिली गदा अस्पृश्य वर्गाच्या कामगारावर येते. इतर वर्गाच्या कामगारांवर येत नाही. याचे कारण इतर वर्गाच्या कामगारांचे जातीचे व धर्माचे प्रतिनिधी त्यांच्या कौन्सिलमध्ये असतात. ते त्यांच्यावतीने तिथे भांडतात. आपल्या वर्गाचे प्रतिनिधी तेथे नाहीत. आपला एक प्रतिनिधी आहे पण तो विचारा आपल्या वर्गासंबंधी तेथे काही बोलतच नाही. पण यापुढे शेकडा १८ प्रतिनिधी व्हाईसरॉयच्या कायदे कोन्सिलमध्ये आपल्या वर्गातर्फ निवडले जाणार आहेत. त्यावेळी आपण सर्वांनी सावध राहून कायदे कौन्सिलमध्ये योग्य काम करणारीच माणसे निवडून पाठविली पाहिजेत. शेवटची गोष्ट तुम्हास सांगतो की, "दैवावर भरवसा ठेवून वागू नका.' जे काय करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा. आपण माझे भाषण इतका वेळ शांतपणे ऐकून . घेतलेत व हा सभेचा योगायोग जुळवून आणलात याबद्दल मी सर्वांचे आभार मानून आपली रजा घेतो.