१९-२-१९३२ कोकणस्थ-देशस्थ हा भेद मला मान्य नाही - Page 433

६५
कोकणस्थ-देशस्थ हा भेद मला मान्य नाही

रविवार ता. १९ फेब्रुवारी १९३३ रोजी श्री. देवराव नाईक यांचे अध्यक्षतेखाली दांडारोड वांद्रे, मुंबई येथे अस्पृश्यांची एक जाहीर सभा झाली. सभेचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाहीर स्वागत करून त्यांचा सन्मान करण्याचा होता व त्याप्रमाणे त्यांच्या कार्यास मान्यता दर्शविण्याकरिता त्यांना पुष्पगुच्छ ठेवण्याचे रौप्यपात्र अर्पण करण्यात आले. सभेस वांद्रे येथे राहणारा स्त्री-पुरूष समाज हजर होता. डॉ. बाबासाहेबांचे या सभेतील सर्व भाषण अंतर्मुख दृष्टी ठेवून झाले. त्यामुळे अलिकडे समाजातील ज्या काही व्यक्ती तरुणास हाती धरून समाजकार्य बिघडवीत आहेत त्यांचा नामनिर्देश करणे भाग पडले. ते आपल्या भाषणात म्हणाले

ठाणे येथील बोर्डिंग व समता सैनिक दल या संबंधी ही मंडळी गैरसमज उत्पन्न करून समाजात दुहीचे बीज पेरण्याचे दुष्ट काम करीत आहेत. ही मंडळी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याच समाजातील आहेत. ती वयोवृद्ध असून मी व आपण सर्वजण त्यांना अद्याप मान देत असू. पण आज त्यांनी आपला अनुभव व आपली बुध्दी गहाण ठेविली आहेत. रा. संभाजी गायकवाड, ' रा. गोविंद रामजी आड्रेकर व रा. शिवराम गोपाळ जाधव यांनी या मंडळींचे पुढारीपण पत्करिले आहे. यांची बुध्दी वाढत्या वयाप्रमाणे वृद्धिंगत होण्याच्या ऐवजी ती कमी होऊ लागली आहे. आश्चर्य हे की काही तरूण मंडळीही त्यांच्या नादी लागून आपल्या शक्तीचा, वेळाचा व वक्‍्तृत्वाचा दुरूपयोग [करीत ] आहेत. ही तरूण मंडळी तरी विचाराने वागून आपली [सर्व ] [शक्ती ] [समाजात ] [एकी ] वाढविण्याकरिता खर्च करतील अशी मला आशा आहे. ह्या लोकांचे आजचे कार्य म्हणजे माझ्या गैरहजेरीचा फायदा घेऊन सार्वजनिक [कार्याचा ] [नाश ] [करणे ] [एवढेच ]

आहे.

त्यांचे आक्षेप माझ्या ऐकिवात आले [ते, ] [थोडक्यात ] [असे ] [आहेत. ]

१. ठाणे येथील बोर्डिंगमध्ये कोकणस्थ [मुलांना ] [प्रवेश ] [मिळत ] [नाही. ]

२. या बोडिंगवर रा. शिवराम गोपाळ [जाधवाची ] [सुपरिन्टेडेन्ट ] [म्हणून ]

नेमणूक करावी.

३. सुभेदार सवादकर यांना [सेना ] [दलाचे. ] [सर्वाधिकारी ] [का ] [नेमले ] [? ]

४. आपल्या चळवळीत इतर [जातींचा ] [प्रवेश ] [का ] [? ]

जनता : २५ फेब्रुवारी १९३३.