६६
लोकांच्या धर्मभोळेपणाचा फायदा
घेणाऱ्यांपासून सावध रहा
शनिवार तारीख ४ मार्च १९३३ रोजी रात्रौ साडे नऊ वाजता मुंबई सँडहर्स्ट रोड (वाडीबंदर) नजीक जी. आय. पी. रेल्वेच्या चाळीजवळील पटांगणात मुद्दाम उभारलेल्या मंडपात श्री. आर. डी. कवळी, बी. ए., एलएल. बी. यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची जाहीर सभा होऊन ह्या सभेत अखिल अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. सदर प्रसंगी स्त्री-पुरूष समाज पुष्कळ जमलेला होता. श्री. शिवतरकर, श्री. नाईक, सहस्त्रबुद्धे, दिवाकर पगारे, शा. उपशाम, कमलाकांत चित्रे, मेषराम इत्यादी मंडळीही सभेला हजर होती.
प्रथम रा. पुंजाजी जाधव यांनी अध्यक्षाची सूचना आणिली व तिला रा. करडक यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष रीतसर स्थानापन्न झाल्यावर रा. दिवाकर पगारे यांनी मानपत्र वाचून दाखविले. त्या मानपत्रावर ८५ दीर्घायुरारोग्य चिंतणाऱ्यांची नावे होती. मानपत्र पुढीलप्रमाणे आहे.--
' जातिभेदविध्वंसक, समाजक्रांतिकारक, हितमार्गदर्शक मूकनायक
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर .
एम्. ए ; पीएच.डी., डी.एसूसी., बार-अँट-लॉ.
एम. एल. सी., जे. पी., मुंबई.
परमप्रिय डॉ. बाबासाहेब ! आपले चरणसेवेशी, मुंबई, सँण्डहर रोड, वाडीबंदर नजीक जी. आय. पी. रेल्वे चांळीमधील नाशिक जिल्ह्यातील ' अस्पृश्य ' मानण्यात येणाऱ्या आपल्या सर्व आज्ञाधारक व नम्र अनुयायांचा सप्रेम जोहार सादर असो ! |
आपला प्रत्येक क्षण बहुमोलाचा आहे तरी पण आम्हा गरिबांच्या उत्कट इच्छेनुरूप आज येथे येण्याची आपण PUT केलीत, त्यामुळे आम्हाला फार धन्यता वाटली. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.
जनता : ११ मार्च १९३३.