३९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आपण अत्यंत गुणशाली आहात तसेच अमूप धैर्यशालीही आहात. आपल्या
अतुल बुद्धिमत्तेची आणि अप्रतिम शौर्यवृत्तीची कसोटी पाहणारे आणि साक्ष
पटविणारे अनेक लहान-मोठे प्रसंग आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यक्रमात येऊन
गेले आहेत. आपली यशप्रद विद्यार्थीदशा, महाड व नाशिक सत्याग्रहप्रसंगीचे
आपले स्फूर्तिदायी नेतृत्व, राऊंड टेबल परिषदेतील आफ्ली समाजहितप्रद
कामगिरी व पूना कराराच्या वेळी प्रगट झालेला आपला प्रबल आत्मविश्वास हे
आपल्या विशाल बुद्धिमत्तेची व अचाट धैर्यवृत्तीची साक्ष पटविणाऱ्या आपल्या
आयुष्यातील विविध प्रसंगांपैकी अगदी ठळक असे काही थोडे प्रसंग
आहेत. यशस्वी विद्यार्थी, कुशल मुत्सद्दी व धैर्यवान पुढारी अशी आपली कीर्ती
या प्रसंगांमुळे दिगंत पसरून अजरामर झालेली आहे. जसजसा काळ लोटेल
तसतसा आपला हा कीर्तिदीप अधिकाधिक प्रज्वलित होणार हे निश्चित आहे.
महाराज, आपण आमचा मार्ग प्रकाशित केला आहे. आमच्या हृदयात
अभिनव चैतन्याची दिव्य ज्योत आपण पेटविली आहे. युगानुयुगांच्या
अज्ञानांधकाराला भेदून प्रकाश दाखविणारी व पूर्वी कधी कोणी आम्हाला न दिलेली नवी ज्ञानदृष्टी आपण आम्हाला प्राप्त करून दिली आहे. . केवळ जगाच्या दृष्टीनेच नव्हे तर खुद्द आमच्या दृष्टीनेही आमची किंमत आपण वाढविली आहे. आमचा स्वाभिमान आपण जागविला आहे. आम्हाला आत्मसन्मानाचे महत्त्व आपण पटवून दिले आहे.
|
आपणच आमचे अनन्य पुढारी, आमचे अचूक मार्गदर्शक, आमचे सम्मिन्न, ` आमचे सर्वस्व आहात. आमचा देव आणि आमचा धर्म, आमचे राजकारण आणि आमचे समाजकारण आपल्या शब्दात आणि आपल्या धोरणात सामावलेले आहे.
सन्माननीय महाराज, आम्ही गरीब असलो तरी आमचे आपल्या ठायीचे प्रेम, आमची आपल्याविषयीची निष्ठा व आमचा आपल्यावरील विश्वास ही समर्थ व अढळ आहेत. त्यांच्या जोरावर आपण सांगाल तो मार्ग-मग तो कितीही बिकट असो-चालून जाण्याचा आम्ही अंतःकरणपूर्वक व जिवापाड प्रयत्व करू, असे आपल्याला आश्वासन देण्याची या प्रसंगी आम्ही परवानगी घेतो. आणि आमच्या निष्ठेचे, Bass व आम्हा सर्वाच्या वतीने आपणास जाहीरपणे दिलेल्या आजच्या या आश्वासनाचे आणि आजच्या या भाग्यशाली दिवसाचे एक अल्पसे स्मारक व जक लहानसा पुरावा म्हणून फुल नाही फुलाची पाकळी या न्यायाने हे मानपत्र आपल्या चरणी आम्ही आज सादर करीत आहोत. त्याचा स्वीकार करून आम्हाला कृतार्थ करावे, १
|
नंतर अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्यात आले. त्या प्रमाणेच एक चांदीची कपबशी व हारतुरे देऊन डॉ. बाबासाहेबांचा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित मानपत्र : संपादक शंकरराव हातोले, पू. १२-१३