लोकांच्या धर्ममोढेपणाचा . . ... . ', सावध रहा ३९३
सन्मान करण्यात आला. एवढे झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तरादाखल भाषण करण्यास उभे राहिले. प्रथम झालेल्या गौरवाबद्दल आभार प्रदर्शन करून ते म्हणाले,
या मानपत्रात माझ्या संबंधाने गौरवपर जे काही लिहिले आहे ते कितपत खरे आहे, हे सांगणे कठीण आहे. परन्तु एवढे मात्र खरे की त्यात स्तुतिपर अलंकारयुक्त भाषेने तुम्ही तुमच्याच सारख्या एका माणसास गुणातीत ईश्वर बनविले आहे. हे जर खरे मानले तर या तुमच्या भावना स्वहितनाशक आहेत, असेच मी समजतो व आज मूले कुठारः म्हणूनच प्रथम दोन शब्द सांगणे प्राप्त आहे. दुसऱ्याला ईश्वर बनवायचे व आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकावयाचा ही भावना तुम्हास कर्तव्यपराङ्मुख करणारी आहे. या भावनेला जर का चिकटून बसलात तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे लाकडाचे ओंडके बनून तुमच्या अंगी वास करीत असलेली शक्ती निकामी ठरेल व या नवयुगात प्राप्त झालेली राजकीय सत्ता निरर्थक ठरेल. आजपर्यंत तुम्ही या नादान भावनेस तुमच्या मनात घर करू दिल्यामुळे तिने तुमच्या वर्गाचा समूळ नाश केला आहे. मी याच्याही पुढे जाऊन असे सांगतो की असल्या नादान भावनेने तुमचाच काय पण सर्व हिंदू समाजाचा नाश केला आहे. आपल्या या हिंदुस्थान देशाच्या हीनत्वाला काही कारण असेल तर हे देवपण होय.
इतर देशातील लोक समाजात काही बखेडा माजल्यास किंवा समाज संकटात सापडल्यास एकोपा करून व सर्व सामर्थ्य एकवटून आपला स्वत:चा उद्धार करून घेतात. परन्तु आपल्या धर्माने आमची अशी समजूत करून दिली आहे की, माणूस काही करू शकत नाही. समाजावर मोठे संकट आंल्यास किंवा समाजाची प्रगती खुंटल्यास देव आपल्यामध्ये अवतार घेतो व आपले संकट o निवारण करतो, सार्वत्रिक रीतीने संकटास तोंड न देता ईश्वराच्या अवताराची
वाट पाहात बसतात.
आमचा हिंदू धर्म पुरातन आहे, ग्रीक, रोमन इत्यादि पुरातन व प्रसिद्ध राष्ट्रे लयाला गेली, परन्तु आमचा हिंदू समाज अद्याप जिवंत आहे अशी हिदू लोक शेखी मिरवितात. परन्तु नुसत्या जगण्यात कवडीची किंमत नाही. मनुष्य इज्जतीने जगतो की नाही याला महत्त्व आहे. या दृष्टीने पाहिल्यास हिंदू समाजाने जिवंत राहून काय दिग्विजय लावला आहे ? दुसऱ्याचे लाजिरवाणे दास्य पत्करण्यापलिकडे त्याने काय केले आहे ? असल्या जगण्यात काही अर्थ नाही. मर्दुमकी गाजवून दोन दिवस जगणे हे दुसऱ्याचे गुलाम होऊन १०० वर्षे जगण्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठपणाचे लक्षण होय. दोघांच्या झुंजीत एकजण पलायन करूनही जिवंत राहतो व जगतो, तर