४-३-१९२२ लोकांच्या घर्मभोळेपणाचा फायदा घेणाऱ्यांपासून सावध रहा - Page 439

. लोकांच्या धर्मभोळेपणाचा . . . . . .. सावध रहा ३९५

तुमची स्थिती पालटण्यास, तुमचा उद्धार करून घेण्यास आता तुम्हाला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे राजकारण-कायदे करण्याची शक्ती । तुम्हास पोटभर खाण्यास मिळत नाही, तुम्हाला लहानशा खोलीत गर्दी करून राहावे लागते, तुम्हाला TAG करण्याचे साधन मिळत नाही व तुम्हाला बेकार राहावे लागते, याचे कारण काय? देव का दैव? या दोन्ही गोष्टी कारण नाहीत. तुम्हाला अन्न, वस्त्र, वसतिस्थान व शिक्षण देणे हे देशातील कायदे करणाऱ्या सत्तेचे काम आहे व या सत्तेचा कारभार तुमच्या सामर्थ्याने यापुढे चालणार आहे. या कायदे करणाऱ्या शक्तीत तुमचा समावेश झालेला आहे. संसार सुखाचा करून घेण्याकरिता त्या प्रकारचे कायदे तुम्ही करून घेतले पाहिजेत. समजा आज या रेल्वेच्या चाळीत तुम्हास प्रत्येक कुटुंबास एकच खोली मिळते परंतु कायदा होईल तर तो तुम्हास २-२ खोल्या सुद्धा मिळवून देईल:

तुमच्या मुलास शिक्षण देण्यास तुमच्याजवळ पैसा नाही परंतु कायदा होईल तर तुमच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व सोय लागेल. तुमच्यात पुष्कळसे लोक बेकार आहेत. सर्व लोकास काम देणे किंवा काम नसेल त्या वेळेस त्यांना पोसणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असा कायदा होईल तर बेकारीत उपाशी मरण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही.

श्रीमंत लोक आजारी पडले तर पैसे खर्च करून औषधोपचार करतात व बरे होतात. परंतु गरिबांची आजारपणात कायद्यानेच सोय होईल. सारांश, सध्या सर्व सुखाचे आगर कायदा आहे. म्हणून आपण सर्वानी कायदा करण्याची शक्ती पूर्णपणे हस्तगत करून घेतली पाहिजे. म्हणून ' जप, तप, पूजा-अर्चा करणे ` इकडील आपले लक्ष काढून राजकारणाची कास धरणे हाच तुमच्या. उद्धाराचा मार्ग आहे. हीच गोष्ट आज प्रामुख्याने मला तुम्हाला सांगावयाची होती आणि ती तुम्हास स्पष्टपणे सांगितली आहे.

थोड्या दिवसापूर्वी काँग्रेसचे व वरिष्ठ वर्गाचे लोक असे म्हणत असत की आम्हाला हवे तसे स्वराज्य दिल्याशिवाय आम्ही ते चालविण्यास मदत करणार नाही. परंतु आज ते निराळीच भाषा वापरू लागले आहेत

कालच कायदेभंग करुन तुरुंगात शिक्षा भोगत असलेले काँगेसचे एक पुढारी सरकारची माफी मागून बाहेर आले आहेत व ते म्हणू लागले आहेत की, '' म. गांधींची कायदेभंगाची चळवळ चुकीची आहे. मी यापुढे कायदेभंग करणार नाही. “ त्यापूर्वी महात्मा गांधींचे पट्टशिष्य श्री. राजगोपालाचारी यांनी जाहीर केले आहे की नवीन सुधारणा मिळाल्यावर काँग्रेस शक्यतर त्यांचा स्वीकार करील. केसरीचे रा. केळकर यांचे म्हणणे आहे की नवीन मिळणाऱ्या सुधारणा अपुऱ्या असल्या तरी सुद्धा त्या मान्य करण्यास आम्ही कबूल आहोत