२-४-१९३३ स्वतःची लायकी विद्यार्थीदशेतच वाढवा - Page 441

६७
स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा

रविवार ता. २ माहे एप्रिल १९३३ रोजी सकाळी दहा वाजता मुंबईहून दलित पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, IR-He लॉ, हे अखिल भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाच्या ठाणे येथील-मुंबई ठाणे रोडवरील नामदार ' आगाखान ' यांचे प्रशस्त बंगल्यात असलेल्या दलित-विद्यार्थी आश्रमाची तपासणी करण्यानिमित्त निमंत्रण देण्यात आल्यावरून मुद्दाम आले होते. त्यांना ' आश्रमात ' आणण्याकरिता आश्रमाचे सुपरिन्टेडेंट श्रीयुत चांदोरकर आणि ठाणे सामाजिक समता सेवा संघाचे खजिनदार श्रीयुत मारुतीराव साबाजी गायकवाड असे दोघेजण पुढे स्टेशनवर उतरून घेण्यासाठी गेले होते.

डॉ. बाबासाहेबांचे बरोबर त्यांचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत शिवतरकर आणि डॉ. बाबासाहेबांचे मुंबईतील सहकारी कार्यकर्ते म्हणजे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, कमलाकान्त चित्रे, जाधव, गायकवाड, मडके बुवा वगैरे पुढारी मंडळी देखील आलेली होती. डॉ. बाबासाहेब यांचे आगमनाचे किती तरी वेळ अगोदर ठाणे शहरातील अस्पृश्योद्धारक स्पृश्य सभ्य नागरीक जमले होते त्यात ठळकपणे दिसणारे गृहस्थ म्हणजे श्रीयुत एम. एस. रांगणेकरसाहेब, एल. राँड्रिक्ससाहेब, आर. एल. रेडेसाहेब, नाखवा, गटनेसाहेब, केसकरसाहेब, कोतवालसाहेब, माधवराव काळदाते, पद्मनाभशास्त्री पालये वगैरे हितचिंतक दिसत असून दलित समाजातील सर्व लहान थोर स्त्री-पुरुष समुदाय स्थानिक गिरण्या, कारखाने वगैरे चाल. असताना देखील ठिकठिकाणाहून बाबासाहेबांच्या आगमनाच्या बातमीने जमलेला होता. |

डॉ. बाबासाहेब मोटारमधून उतरून बोर्डीगचे इमारतीचे पायरीवर येताच त्यांचा जयजयकार झाला. सामाजिक समता सेवा संघ, आश्रमीय विद्यार्थी वर्ग आणि अखिल भारतीय दलित सेवक संघ (ठाणे शाखा) यांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांचे तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आल्यावर श्रीयुत एम. एस. रांगणेकर यांनी डॉ. बाबासाहेबांना नियोजित जागी बसविल्यावर श्रीयुत गणपत गोविंद रोकडे यांनी डॉ. बाबासाहेब यांनी जमलेल्या समुदायाच्या मिश्र सम्मेलनाचे अध्यक्षस्थान स्वीकारून विद्यार्थ्यांना उपदेशवर दोन शब्द सांगण्याची विनंती केली आणि श्रीयुत मारुतीराव साबाजी गायकवाड यांनी त्या सुचनेला अनुमोदन दिल्यावर

जनता : २२ एप्रिल १९३३.