६८
नकली व स्वयंमान्य पुढाऱ्यांपासून सावध
तारीख ८ एप्रिल १९३३ रोजी रात्रौ क्लार्क रोड, बी. आय. टी. चाळ, मुंबई येथे मे. सुभेदार वि. गं. सवादकर यांचे अध्यक्षतेखाली तेथील चार चाळीत राहणाऱ्या बहिष्कृत समाजातर्फे दलितोद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस मानपत्र देण्याचा समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. स्त्री-पुरुष समाजाची इतकी गर्दी होती की, चाळीतील.कंपाऊंडमधील मैदान चिक्कार भरून जाऊन कंपाऊंड बाहेरही लोकांची गर्दी झाली होती. प्रथम रा. धोत्रे यांनी अध्यक्षांची सूचना आणिली व तिला रा. तांबेशास्त्री यांनी अनुमोदन दिल्यावर अध्यक्ष मे. सवादकर हे स्थानापन्न झाले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आपणास अध्यक्षस्थान दिल्याबद्दल लोकांचे आभार मानून सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजास सामाजिक व राजकीय हक्क मिळवून दिले आहेत त्याबद्दल त्यांना मानपत्र देणे योग्य आहे. परंतु मानपत्र देऊनच आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. तर त्यांनी आरंभिलेले कार्य व्यवस्थशीर रीतीने चालविणे हे आपले कर्तव्य आहे. विघ्नसंतोषी माणसे सर्व समाजात असतात तशी ती आपल्या समाजातही आहेत. तेव्हा अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. (टाळ्या) तसेच तालुका व जिल्हा संघ कादून आपण आपली संघटना केली पाहिजे इत्यादी. |
अध्यक्षांच्या भाषणानंतर रा. आबाजी आनंदराव खरात यांनी मानपत्र वाचून दाखविले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अध्यक्षांच्या हस्ते ते सोनेरी फ्रेमीतून अर्पण करण्यात आले. मानपत्राबरोबरच एक रौप्यपात्रही अर्पण करण्यात आले. हारतुरे अर्पण केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास
उभे राहले. ते म्हणाले, |
सभाधिपति, प्रिय भगिनी व बंधुजनहो,
आज ह्या ठिकाणच्या रहिवाश्यांनी हा जो मानपत्राचा प्रसंग घडवून आणिला
त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी गेल्या जानेवारी महिन्यात (१९३२) विलायतेहून मुंबईस आल्यापासून मला मानपत्रे देण्याची एक मोठी साथच पसरली आहे. ही साथ बंद करावी, निदान तिला आळा घालावा असे माझ्या मनात आले होते. परंतु लोकांच्या उत्साहापुढे माझा नाईलाज आहे. आजचे मानपत्रसुद्धा त्याच मनःस्थितीत मी स्वीकारीत आहे. FS ee a ee
जनता : १५ एप्रिल १९३३.