४०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
या मानपत्राबद्दल मला असे सांगावयाचे आहे की, आतापर्यंत जी मानपत्रे
मला दिली गेली त्यापेक्षा आजच्या मानपत्रात वैशिष्ट्य आहे. या मानपत्राचा गाजावाजा विशेष झाला. अगोदर जी मानपत्रे दिली गेली ती दिली जाणार अशाबद्दल वर्तमानपत्री मुळीच गाजावाजा झाला नव्हता. परंतु या मानपत्राच्या अंतस्थ भानगडी “ लोकमान्य “ व *' प्रभात “ पत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या, म्हणून हे मानपत्र और परिस्थितीत दिले जात आहे असे मला वाटते. आता आम्ही इकडे येत असताना सांगण्यात आले की, रस्त्यावर “ सवादकर gape’ अशी पाटी लाविली आहे. (सभेत शेम शेमचा आवाज) तरी ती टाळण्याकरता आपण दुसऱ्या रस्त्याने जावे. परंतु मी सांगितले की, आपण पाटीच पाहून जाऊ. आम्ही ती आता पाहिली आहे. पाटी लावणारांना धीर न झाल्यामुळे त्यांनी माझा बायकॉट केला नाही । या चार चाळीत पुढाऱ्यांचे गोठे पेव आहे हे मी जाणून आहे. मुंबईत पुढारी शोधावयाचे झाल्यास त्यांनी या चौकात यावे. या पुढाऱ्यांनी आतापर्यंत काहीना काही खुसपट काढून चळवळीस अडथळा केला आहे. एकावेळी हे पुढारी असे म्हणत होते फी, डॉ. आंबेडकर महाराला सोडून चांभारांना जवळ करतात व महार जातीचा घात करतात. परंतु असे म्हणणारेच हे लोक देवरूखकरासारख्या सबंध महार जातीला शिव्या देणाऱ्या चांभारांबरोबर संगनमत करतात व अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात.
एकदा रा. शिवतरकर मास्तर यांनी आपल्या घरी सहभोजन करविले. त्या सहभोजनास मी स्वतः व काही महार पुढारी हजर होते. सहभोजनाला अनुसरून पुढे देवरूखकराने हँडबील काढले की, ' शिवतरकर महाराबरोबर जेवले सबब त्यांच्यावर बहिष्कार घालावा, कारण रा. शिवतरकरांनी महारा- समवेत भोजन केले. ' सबंध महार जातीची त्यावेळेस देवरूखकराने अवहेलना केली होती. अशा प्रकारे अनेक वेळा ज्या गाणसाने महार जातीची अबरु लुटली त्याशी हे लोक कसे संगनमत करू शकतात ! Al Gerard दुसरे म्हणणे असे की, डॉ. आंबेडकर हे कोकणस्थ असून दे! स्थांचा परामर्ष घेतात व कोकणस्थांचा घेत नाहीत. देशस्थ व कोकणस्थ वाद इतका माजविला होता की, थोड्याच दिवसात आपापसात मारामारीचा प्रसंग आला असता. परंतु त्याच लोकांनी देशस्थांशी संगनमत करून ११९ पुढाऱ्यांची सभा भरविली. मग सुभेदार सवादकरालाच का खड्यासारखे वगळले ? ते समजत नाही, ते तर हाडामासाचे कोकणस्थच आहेत ना ? सांगावयाचे हे की, या वादाला काही मूळ किंवा तत्त्व नाही. तत्त्वदृष्ट्या विरोध उसला तर चालेल. परंतु तत्त्वाशिवाय