नकली व स्वयंमान्य पुढाम्यांपासून सावध ४०१
विरोध असेल तर त्यात काही तरी आपमतलबीपणा असला पाहिजे यात शंका नाही. सर्व पुढाऱ्यांची एकी का करीत नाही असा एक प्रश्न आहे. पण जेथे व्यक्तीविशिष्ट भांडण आहे तेथे कोण काय करणार ? तत्त्वाचा प्रश्न असेल तर गोष्ट निराळी. म. गांधींनी मंदीर प्रवेशाबद्दल माझे मत विचारले असता मी सांगितले की, मंदीर प्रवेश मिळून जातीभेद मोडत असेल तर तो मला पाहिजे आहे. तसे होत नसेल तर मंदीर प्रवेशाची आम्हास जरूर नाही. या वादात तत्व आहे. या पुढाऱ्यांच्या भांडणात असे काहीच नाही. असे जरी असले तरी मला आनंद होतो की, कोणीही तुमच्यात फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्याला फसत नाही. स्वतःचे स्वातंत्र्य असण्यासाठी माणसाला नोकरी तरी पाहिजे किंवा वडिलोपार्जित इस्टेट तरी पाहिजे. तसे नसेल तर चोरी करून, भीक मागून किंवा दुसऱ्यांची हाजी हाजी करून पोट भरावे लागते. आपल्यात पुष्कळ लोक बैकार आहेत व इतर समाजाजवळ पुष्कळ पैसे आहेत. पुढच्या निवडणुकीच्या वेळेस असा प्रसंग येणार आहे की, इतर लोक पैसे देऊन आपल्या लोकांची मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील व आपल्यातील बेकार व स्वाभिमानशून्य असे काही पुढारी त्यांना मदतही करतील. तरी या गोष्टीपासून तुम्ही सावध असले पाहिजे. या बाबतीत आपल्या नकली व स्वयंमान्य पुढाऱ्यांपासून तुम्ही सावध रहा,
डॉ. आंबेडकरांचे काम अडवण्यासाठी वरीष्ठ समाजाचे पुष्कळ लोक टपलेले असतात. असे लोक आपल्यातील लाचलुचपतीला चटावलेल्या लोकांना जवळ करणारच. माझा असा अनुभव आहे की, मी हिंदुस्थानात नसल्यावर या लोकांचे
फावते.
मी या महिन्याच्या २२ तारखेला विलायतेस जाणार आहे. म्हणून मी गेल्यावर हे लोक तुमच्यात दुफळी करतील. तुम्ही कोणाच्याही नादी न लागता एकीने वागाल अशी मला आशा आहे. आजचा प्रसंग आणून दिल्याबद्दल पुन्हा सर्वांचे आभार मानून मी माझे भाषण संपवितो.
8 BO