२१-३-१९२० जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे. - Page 45

जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे . . . . . . . कल्याण झाले आहे ३

व्यापार करण्याची सोय उरली नाही. शिवाशिवीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही व कधी कधी गुणाने योग्य असूनही खालचे जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या _ हाताखाली नोकरी करण्यास कचरतात म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते, याच भावनेमुळे मिलिटरीतून त्यांचा उठाव झाला आहे. शेतीच्याबाबत त्यांची तशीच दशा आहे. अशा हाडकी हडवळ्यापेक्षा भूईचा तुकडा विशेष कोणाला आहे ? अशाप्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती होणार नाही. नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही दोन उन्नतीची आद्य कारणे आहेत. बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाण नाही, हे सर्वास मान्य आहे. परंतु त्यांचा विकास होत नाही याचे मूळ कारण त्यांना परिस्थिती सानुकूल नाही, हे होय. परिरिथती . सानुकूल करून घेण्यास अनेक उपाय सुचविले जातात; परंतु याकरिता आपण: राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे व जातवार प्रतिनिधीत्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही. 'सत्यमेव जयते' हे तत्त्व पोकळ आहे. सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेविली पाहिजे, असे सांगून त्यांनी आपले प्रास्ताविक भाषण संपविले. नंतर विषयनियामक कमिटी नेमण्यात येऊन पहिल्या दिवसापुरते परिषदेचे काम संपले.

दिवस दुसरा.

परिषदेच्या कामास तीन वाजता सुरुवात झाली. त्याप्रसंगी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी हजर राहून सर्व बहिष्कृत वर्गास ऋणी करून सोडिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

आज माझे प्रिय मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले

आहे. त्यांच्या भाषणाचा लाभ मला मिळावा म्हणून मी शिकारीतून बुध्या येथे आलो आहे. मि. आंबेडकर सर्व मागासलेल्या जातींचा परामर्ष घेतात याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करितो.

महार, मांग, चांभार, ढोर हे खरोखर वैश्य जातीचे असून व विशेषतः महार लोक पूर्वी महारकी सूत काढून व्यापार करीत आसता त्यांना अस्पृश्य कोणी ठरविले असेल कोण जाणे. असा वैश्याचा धंदा सोडून दस्यु म्हणजे नोकर आणि नोकर म्हणजे अतिशूद्र. तेव्हा आंबेडकरांनी असा हा धंदा का पत्करला आहे मला

कळत नाही. तथापि, मी येथे जमलेल्या सर्व लोकास हीच विनंती करितो की,

आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने